1 May महाराष्ट्र दिन व कामगार दिन, महाराष्ट्र दिन व कामगार दिनाची पार्श्वभूमी


महाराष्ट्र दिन व कामगार दिन

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाची पार्श्वभूमी  

                   1 मे हा जगभरामध्ये कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील 80 पेक्षा अधिक देशांमध्ये कामगार दिनानिमित्त या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. 19 व्या शतकाच्या मध्यामध्ये कामगार चळवळीची सुरुवात झाली. या चळवळीची मुख्य मागणी होती कामाची वेळ ही आठ तास असावी. या चळवळीमुळे सर्व कामगारांना पुढील सर्व सेवा व सवलती देण्यात आल्या.

  • कामाची वेळ 12 तासावरून 8 तास करण्यात आली.
  • पीएफ योजना सर्व कामगारांना लागू करण्यात आली. 
  • वेतन आयोग सर्व कामगारांना लागू करण्यात आला. 
  • पेन्शन योजना लागू करण्यात आली. 
  • CL/EL/PHL सर्वांना लागू करण्यात आली. 
  • महिलांना पगारी प्रसुती सुट्टी देण्यात आली. 
  • आठवडी सुट्टी (रविवार) सर्वांना सक्तीची करण्यात आली. 
  • पगारी सुट्टी लागू करण्यात आली.
  • ES/IC योजना लागू करण्यात आली. 
  • नोकरीच्या ठिकाणी वेळेमध्ये कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास नोकरी देण्याचा नियम करण्यात आला.

1 मे 1960 रोजी मुंबई प्रांताचे विभाजन होऊन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ 1 मे हा दिवस साजरा केला जातो.

मराठी माणसाला स्वराज्य उभा करता येते - छत्रपती शिवाजी महाराज 

मराठी माणसाला राज्यघटना तयार करता येते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येते - डॉ आनंदी जोशी 

मराठी माणसाला पहिली मुलींची शाळा काढता येते - महात्मा ज्योतिबा फुले

मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येते - सावित्रीबाई फुले

मराठी माणसाला हिंदू हृदय सम्राट बनता येते - हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे

मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येते - प्रतिभा पाटील 

मराठी माणसाला महासंगणक बनवता येते - विजय भाटकर

मराठी माणसाला चित्रपट निर्मितीची मुहूर्तमेढ रोवता येते - दादासाहेब फडके

मराठी माणसाला गाण कोकिळा होता येते - लता मंगेशकर 

मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येते - सचिन तेंडुलकर 

मराठी माणसाला पहिला इंडियन आयडॉल बनता येते - अभिजीत सावंत

म्हणून अभिमान बाळगूया मराठी असल्याचा.

           25 एप्रिल 1960 रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 नुसार महाराष्ट्र व गुजरात राज्याची निर्मिती झाली. मुंबई प्रांतात मराठी, गुजराती, कच्छ व कोकणी भाषिक बोलणारे लोक बहुसंख्य राहत होते. बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 नुसार मुंबई प्रांताचे दोन विभागात विभाजन झाले. 

1) गुजराती व कच्छ भाषिक 

2) मराठी व कोकणी भाषिक 

गुजराती व कच्छ भाषिक लोकाचे गुजरात राज्याची निर्मिती केली. मराठी व कोकणी भाषिक लोकांचे महाराष्ट्र राज्याचे निर्मिती केली. 21 नोव्हेंबर 1956 रोजी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्रमध्ये मुंबई देण्याचे नाकारले. त्यामुळे मराठी भाषिक लोक चिडले होते. त्याचा निषेध करण्यासाठी विराट मोर्चा काढण्यात आलेला होता. हा मोर्चा फ्लोरा फाउंटन समोरील चौकात आला. तेव्हा मोर्चा कर्त्यावरती लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये 106 जणांना हुतात्म्या मिळाले. या हुतात्म्याच्या बलिदानामुळे 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून मराठी भाषकांचे महाराष्ट्र हे स्वतंत्र असे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला.

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, 

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, 

नाजुक देशा, फुलांच्या देशा, कोमल देशा,

प्रणाम घ्यावा माझा, महाराष्ट्र देशा.

महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या