Hemorrhoids मुळव्याधाची कारणे व उपाय, मुळव्याधाची योग्य उपचार पद्धती, मुळव्याधाचे प्रकार, मुळव्याधाची लक्षणे, मुळव्याधीवर ऑपरेशन हाच एकमेव इलाज आहे का?, ऑपरेशन त्रासदायक असते का? व ऑपरेशन नंतर पुन्हा मुळव्याध होते का?

 


                         मूळव्याध म्हणजे काय..?

मलद्वार किंवा गुदद्वार येथे सपाट असलेल्या शिरा कायम स्वरूपात जर सुजू लागल्या तर मुळव्याध होतो. याला पाइल्स असेही म्हणतात. मूळव्याधला Piles किंवा Hemorrhoids असेही म्हणतात. मूळव्याध हा अत्यंत त्रासदायक असा आजार आहे. यामध्ये गुदभाग आणि मलाशय यांच्याठिकाणी सूज येते. यामुळे गुद्द्वारांच्या आत आणि बाहेरील बाजूला कोंब येतात. अनेक लोक पाईल्सच्या त्रासाने त्रस्त आहेत. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. याचे दोन प्रकार आहेत आतील आणि बाहेरील आतल्या मुळव्याधीत मलद्वाराच्या आतील शिरा सुजतात त्याला फोड येतात त्याला भेगा पडतात. तसेच बाहेरील मूळव्याधीत बाहेरच्या शिरा सुजतात किंवा त्याला चिरा पडतात किंवा त्याला फोड येतात. पाइल्स समस्येमध्ये शौचाच्या ठिकाणच्या शिरांना सूज येत असते. तसेच शौचाच्या ठिकाणी खाज होणे, आग होणे, जळजळ आणि भयंकर वेदना होत असतात. त्रास अधिक वाढल्यास शौचावाटे रक्तसुद्धा  जात असते. यासाठी मूळव्याधवर वेळीच उपचार करणे खूप महत्वाचे असते. 


               मुळव्याध कोणत्या कारणामुळे होतो?

दीर्घकाळ चालत असलेला मालावरोध यामुळे होतो. जुलाबाची औषधे जास्त प्रमाणात घेणे, वृद्ध व्यक्तींमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढणे, त्यामुळे लघवीच्या वेळी लागणारा वेळ आणि जोर , स्त्रियांमध्ये गर्भावस्थेत वाढणाऱ्या गर्भामुळे या भागाच्या शिरावर पडणारा दाब अशा अनेक कारणामुळे मुळव्याध हा आजार होतो.

मुळव्याधाचा त्रास होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असू शकतात. प्रामुख्याने चुकीचे खानपान, बद्धकोष्ठता, सततचे बैठे काम, कुटुंबात पाईल्सची अनुवंशिकता असणे, प्रेग्नन्सी आणि लठ्ठपणा असल्यास पाईल्सची समस्या होऊ शकते. बद्धकोष्ठतेमुळे पाईल्सची समस्या होऊ शकते. चुकीच्या आहारामुळे पाइल्सची समस्या होऊ शकते. अवेळी जेवणे यामुळे समस्या निर्माण होऊ शकते.


             मूळव्याधची लक्षणे कोणती आहेत ?

शौचाच्या वेळी मलाद्वारा वाटे रक्तस्त्राव होणे. हे मूळव्याधाचे प्रमुख लक्षण आहे. शौचाच्यावाटे सफेद रंगाची शेंबही पडते. मूळव्याध समस्येमध्ये गुदद्वाराच्या शिरांना सूज येते, त्याठिकाणी कोंब किंवा मोड येतात. गुदाच्या ठिकाणी भयंकर वेदना होणे, खाज येणे, जळजळ व आग होणे अशी लक्षणे आहेत.

शौचाच्या वेळी त्रास अधिक वाढतो. काहीवेळा शौचातुन रक्तही जात असते. अधिक प्रमाणात रक्त जाण्यामुळे ऍनिमिया होऊ शकतो. मुळव्याध झालेल्या व्यक्तीस नेहमीच वेदना होतात असे नाही परंतु जर जास्त वेदना होऊ लागल्या तर गुंतागुंत वाढली आहे हे आपण लक्षात घ्यावे. अशावेळी डॉक्टरचा सल्ला आवश्यक घ्यावा.


                  मूळव्याध प्रकार (Piles Types)

                    Internal Hemorrhoid

अंतर्गत पाईल्स हे गुदाच्या आत होतात. शौचाच्यावेळी इंटर्नल पाईल्सचे कोंब बाहेर येतात आणि नंतर पुन्हा आत आपल्या जागेवर जातात. इंटर्नल पाईल्सचे चार ग्रेड (piles garde) मध्ये वर्गीकरण केले जाते.

  1. पहिली ग्रेड – Piles Grade - यातून रक्त येऊ शकते मात्र यातील कोंब गुदाच्या ठिकाणी हे बाहेर येत नाहीत.
  1. दुसरी ग्रेड – Piles Grade - शौचाच्यावेळी या प्रकारचे कोंब बाहेर येतात आणि पुन्हा आत आपल्या जागी जातात.
  2. तिसरी ग्रेड – Piles Grade - शौचाच्यावेळी या प्रकारचे कोंब बाहेर येतात मात्र ते आपोआप पुन्हा आत जात नाही. ते आत जाण्यासाठी हाताने ढकलावे लागतात.
  3. चौथी ग्रेड – Piles Grade - या प्रकारचे कोंब हे सतत बाहेर आलेले असतात. ते ढकलूनही आत जात नाहीत. त्याचे कोंब जास्त सुजलेले आणि वेदनादायक असतात.


                        मुळव्याध आणि उपचार 

मूळव्याधचा प्रकार, स्थिती यावर उपचार अवलंबून असते. आतील भागाची तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते. प्रॅक्टोस्कोप या यंत्राद्वारे गुरुद्वाराच्या आत निरीक्षण करून मुळव्याध आहे किंवा नाही हे देखील पाहता येते. त्याचबरोबर मूळव्याधीचा प्रकार आणि अवस्था ही समजून घेता येते. सुरवातीच्या त्रासात जीवनशैलीतील बदल, योग्य आहार आणि औषध उपचार याद्वारे मूळव्याधपासून सहज सुटका करता येते. मात्र मूळव्याधकडे दुर्लक्ष केल्यास त्रास अधिक वाढतो आणि अशावेळी मात्र औषधोपचारा बरोबरच काहीवेळा शस्त्रक्रियेचा (piles surgery) अवलंब करावा लागतो. मूळव्याधमध्ये उपचार उपलब्ध आहेत.

                      तसेच मूळव्याधवर अनेक आयुर्वेदिक औषधे गोळ्या, काढा आणि क्रीम स्वरूपात उपलब्ध आहेत. यांमुळे मूळव्याध त्रासातील सूज, वेदना, खाज येणे, रक्त पडणे, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. वारंवार रक्तस्त्राव झाल्याने शरीरातील रक्त कमी होते. जर रक्तस्त्राव खूप होत असेल तर अचानक गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. सुजलेल्या शिरा जर बाहेर आल्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. ऑपरेशन देखील करावे लागते. त्यासाठी एखाद्या सर्जनचा सल्ला घ्यावा. वैद्यकीय सल्ला घेऊन सर्व उपचार करावेत. 


     मुळव्याधीवर ऑपरेशन हाच एकमेव इलाज आहे का?

नक्कीच नाही. मुळव्याध ग्रस्त व्यक्तीच्या शरीर व प्रतिकारशक्ती यावर अवलंबून असते. तसेच रोगाच्या अवस्थेवर अवलंबून असते. सुरुवातीच्या अवस्थेतील सुजलेल्या भागामध्ये एक खास रसायन इंजेक्शनद्वारे टोचून मुळव्याध बरा करता येतो. जेव्हा मुळव्याध दुसऱ्या अवस्थेत असते. त्या वेळेला आराम पडण्यासाठी सुजलेल्या शिरांना इलॅस्टिकच्या पट्टीने बांधता येते. एवढे उपाय करूनही जर मुळव्याध आणखी वाढवले तर मात्र त्याचा ऑपरेशन हा एकमेव पर्याय असतो.

ऑपरेशन त्रासदायक असते का ? व ऑपरेशन नंतर पुन्हा मुळव्याध होतो का? 

मुळव्याधचे ऑपरेशन फार कठीण नसते. सहा सात आठवड्यात ऑपरेशनची जखम भरून येते व बरे वाटू लागते. ऑपरेशन नंतर पुरेशी खबरदारी घेतली तर  मुळव्याध पुन्हा होणे टाळता येते. त्यासाठी वारंवार मलावरोध होउ देऊ नये. पोट साफ होईल याची काळजी घेतली तर मुळव्याध होऊ शकत नाही.

आपले पोट नेहमी रिकामे ठेवावे. पोट गच्च होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच ताज्या पालेभाज्या, टरफले, चोथ्याचे, शिरा असलेले पदार्थ, कोशिंबीर सॅलड इत्यादी पदार्थ आहारात नेहमी ठेवावे .याशिवाय कोमट पाण्यात पोटॅश टाकून त्यांनी तो भाग शेकावा. तसेच डॉक्टरच्या सल्ल्याने प्रक्टोसीडील,  इनोव्हेट यासारखी मलम वापरावीत. अशाप्रकारे मुळव्याध बरा होणारा आजार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या