वृक्ष प्रेमी आमदार श्री सुभाष बापु देशमुख यांची सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीस भेट
आज रविवार दि 9-6-2024 रोजी आदरणीय आमदार सुभाष बापु देशमुख हे पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे अनंत चव्हाण यांच्याकडे सुस्ते गावातील वृक्ष लागवडीच्या चर्चेसाठी आले होते. त्यानंतर सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीचे काम पहाण्यासाठी आज दुपारी आदरणीय सुभाष बापु देशमुख यांनी सरकोली येथे पर्यटन स्थळ येथील वृक्षारोपण, केलेले बीजारोपण, स्थळे व इतर कामाची पाहणी केली. सर्व कामे पाहून समाधान व्यक्त केले. त्यांच्या हस्ते पर्यटनाच्या कामात सतत मदत करणाऱ्या बाल सेवेकरी यांना बिस्कीट पुडे वाटप केले. कामाचा आढावा ऐकला. सरकोली पर्यटन स्थळ येथे श्रमदान करणाऱ्या सेवेकरी यांच्या कामाची स्तुती केली. पर्यटन स्थळावर आणखी कोणकोणत्या कामाचे नियोजन आहे याचा सविस्तर आढावा तयार करा. तो राज्य पर्यटन विभागाचे शिफारशीने केंद्र सरकारकडे पाठवू व मंजूर करून आणू असे सांगितले. सुभाष बापु हे राज्यातील एकमेव आमदार आहेत की ते जिथे जातील तिथे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन या विषयावर गावकरी, युवक यांच्या बरोबर चर्चा करतात. गावकरी यांना येणाऱ्या शासकीय अडचणी सोडवतात. वृक्ष लागवडीत असणाऱ्या प्रमुखांना स्व:ता फोन करून आढावा घेतात व लावलेले वृक्षाचे कसे संवर्धन केले जाते हेही पहाण्यासाठी येतात. लोकमंगल , सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने वृक्ष संवर्धन या विषयावर अनेक वेळा व्याख्याने आयोजित केली आहेत.
चिंचणी पर्यटन स्थळास खूप अनमोल सहकार्य बापुंनी केले आहे. मुंबई,पंढरपूर येथील आजीत कंडरे यांच्या मार्गदर्शनाखाली भंडीशेगाव येथे 17500 रोपांची वृक्ष लागवड केली आहे. त्याचाही पाठपुरावा घेतात. तसेच त्यांच्या मतदारसंघातही प्रत्येक गावच्या नागरिकांना वृक्ष लागवडी बाबतीत प्रोत्साहित करतात. वृक्ष लागवड, संवर्धन या बाबतीत सोलापूर जिल्ह्याची कामगिरी राज्यात उल्लेखनीय व्हावी यासाठी ते सतत प्रयत्नात असतात.
त्यांच्या सोबत श्री आजीत कंडरे, डॉ श्री श्रीधर यलमार, श्री आबासाहेब बाबर, श्री आनंता चव्हाण,श्री गणेश पाटील, श्री तानाजी सालविठल, श्री कुमार वाघमोडे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या