श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील कौठळी गुरसाळे येथील भीमा नदीवर बांधलेल्या नवीन पुलाच्या कामाची पाहणी
पंढरपूर तालुक्यातून जाणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील कौठळी गुरसाळे येथील भीमा नदीवर बांधलेल्या नवीन पुलाच्या कामाची पाहणी मा.आ.श्री प्रशांत परिचारक यांनी केली.
यावेळी ग्रामस्थांनी तेथील सर्व्हिस रस्त्या बाबतच्या काही अडचणी मांडल्या तसेच नादीपत्रातील पंचगंगा परिसरातील महादेव मंदिरास जाण्यासाठी रस्त्याची मागणी केली. या मार्गांवरील सर्वात लांबीचा हा भीमा नदीवरील पूल आहे याची लांबी अंदाजे 622 मि.आसून पंढरपूर मधील हा सर्वात उंच पूल आहे.येत्या दोन दिवसात हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या नवीन पुला मुळे वारी कालावधी मध्ये होणाऱ्या वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
या प्रसंगी उर्वरित कामाचा वेग वाढवुन लवकरात लवकर काम पुर्ण करण्याच्या सुचना संबंधित अधिकारी व कॉंट्रॅक्टर यांना दिल्या.
0 टिप्पण्या