मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिक्षण विषयक बैठक संपन्न
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला शाळा अनुदान टप्पा मिळावा यासाठी अनेक शिक्षक संघटना मागण्या करत असतात. काही शाळा या 20 %, 40 %, 60 % अनुदानही घेत आहे. परंतु आजही काही शाळा अनुदानापासून वंचित आहेत. अशा शाळांना अनुदान मिळावे तसेच अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा मिळावा. यासाठी माननीय मुख्यमंत्री विषयी एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दीपक केसरकर, आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार श्री किरण पावसकर, आमदार श्री तुकाराम काते, माजी आमदार श्री श्रीकांत देशपांडे, शिवसेनेचे सचिव श्री संजय मोरे, श्री शिवाजी शेंडगे आदि यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये खालील सर्व विषय निकाली काढले गेले आहेत.
1) अघोषित शाळा अनुदान देणे - संचालकांना आदेश देऊन कारवाई करण्यास सांगितली आहे.
2) अंशतः अनुदानित शाळांना पुढील टप्पा वाढ फाईल बजेटमध्ये घेतली आहे. अंशतः अनुदानित शाळांना दरवर्षी टप्पा वाढ दिली जाईल. त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना राहिलेला टप्पा अनुदानासाठी बजेटमध्ये फाईल सादर केलेली आहे.
3) एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणार ( कोर्टामध्ये अफेडीवेट पॉझिटिव्ह सादर करणार ) 2005 नंतरच्या लोकांना पेन्शन लागू केली आहे त्याचे सूत्र लवकरच जाहीर करणार.
4) शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येसाठी - राज्यातील वस्तुस्थितीचे विवरण मुख्यमंत्र्यांनी मागवला आहे.
5) बीएमसी शाळांच्या संदर्भात
- शिक्षकांना डीसीपीएस लागू करणार
- रात्र शाळा शिक्षकांच्या समस्या सोडवणार
- दिव्यांग शाळांचे अनुदान मिळणार
- शाळांना वीजदर कमर्शिअल प्रमाणे दिले जाणार नाही
- अपंग समावेशित शिक्षकांना कायम करणे
- अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करणे
- आर टी पुनर्माने रद्द करणे
- नवीन संचमान्यता संच मान्यता निकष दुरुस्ती करणे
- 25% प्रवेश प्रतिपूर्ती शुल्क मिळावे
- नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळां परवानगी व दर्जा वाढ साठी जागेची अट मग काही निकषांमध्ये शितलता आणणे.
- आश्रम शाळा वेळ पूर्ववत करणे
- इंग्रजी माध्यमातील शाळेतील शिक्षकांना सेवा सुरक्षा व किमान वेतन मिळावे
- पेंढारकर कॉलेज व कोटी कॉलेज, ठाणे जिल्हा व विक्रमगड कॉलेज शिक्षकांना मानसिक त्रास देत आहेत, चौकशी करून प्रशासक नियुक्त करणे
- 78 महाविद्यालयांना अनुदान मिळावे
यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ खडसे, माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार श्री किरण पावसकर, आमदार श्री तुकाराम काते, माजी आमदार श्री श्रीकांत देशपांडे, शिवसेनेचे सचिव श्री संजय मोरे, श्री शिवाजी शेंडगे आदि उपस्थित होते. या बैठकीसाठी अनेक संघटनांचे पदाधिकारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.
0 टिप्पण्या