Ramnavmi प्रभू श्रीराम यांचे पाच विशेष गुण



 प्रभू श्रीराम ज्याचे नाव आहे,

अयोध्या ज्याचे धाम आहे,

एक वचनी, एक वाणी,

मर्यादा पुरुषोत्तम, 

अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम.

राम हे विष्णूचा अवतार आहेत. त्यांना रामचंद्र म्हणजेच सुंदर चित्र किंवा दशरथी म्हणजेच दशरथाचा पुत्र किंवा राघव म्हणजेच हिंदू विश्वशास्त्रातील रघुचा वंशज असे म्हणतात.

                   प्रभू श्रीराम यांचे 5 विशेष गुण 

धैर्यशाली 

प्रभू श्रीराम हे धैर्यशाली राजा होते. माता कैकईची आज्ञा पळून त्यांनी 14 वर्ष वनवास स्वीकारला. त्यांना खडतर जीवन प्रवास करावा लागला. पत्नी सीता यांचा त्याग केल्यानंतर राजा असून सुद्धा संन्याशी जीवन जगले. प्रभू श्रीरामांच्या प्रमाणे सर्वांमध्ये धैर्य, नीती, सहनशीलता हे सर्व गुण असले पाहिजेत.

दयाळू 

दयाळूपणा हा मनुष्याचा महत्त्वाचा असा सद्गुण आहे. आपण सर्व प्राणीमात्रांवर दया दाखवली पाहिजे. प्रभू श्रीराम यांनी दया या गुणाने सगळ्यांना आपल्या छत्रछायेखाली आणले. हनुमान, सुग्रीव, केवट, निषधराज, जामवंत व बिभीषण अशा सर्वांना नेतृत्व करण्याचा अधिकार त्यांनी दिला.

मित्रत्व 

प्रभू श्रीराम यांनी मित्रत्वाचे नाते मनापासून सांभाळलेले आहे. सुग्रीव, निषादराज आणि बिभीषण असे अनेक त्यांचे प्रिय मित्र होते. मित्रत्व टिकवण्यासाठी त्यांनी अनेक वेळा स्वतःवरती संकट उडवून घेतलेले होते.

नेतृत्व क्षमता 

प्रभू श्रीराम हे कुशल व पराक्रमी राजा असले तरी ते सर्वांना बरोबर घेऊन चालत होते. याच नेतृत्व क्षमतेमुळे त्यांनी वानर सेनेला बरोबर घेऊन समुद्रामध्ये दगडांनी सेतू पूल बांधला.

आदर्श भाऊ

आज आपण पाहिले तर भावाभावांमध्ये प्रचंड प्रमाणात भांडण तंटे होत असतात. आणि यामुळे कुटुंबामध्ये वाद निर्माण होतात. त्यामुळे कुटुंब सुखी राहत नाही. ज्या घरात बंधू प्रेम असते. त्या कुटुंबामध्ये सुख, आनंद व शांतता असते. प्रभू श्रीराम यांच्याप्रमाणे एक आदर्श भाऊ असणे आवश्यक आहे. लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्यावर प्रेम, त्याग आणि समर्पण प्रभू श्रीराम यांनी केले. त्यामुळे त्यांना एक आदर्श भाऊ मानले जाते.

                प्रभू श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. त्यांनी प्रत्येक काम मर्यादित राहून केले. प्रती प्रश्न न करता आपल्या आई-वडिलांच्या इच्छा नुसार 14 वर्षे वनवास स्वीकारला. प्रभू श्रीराम यांचे चरित्र आपल्याला आई-वडीलांची सेवा करणे व त्यांची आज्ञा पाळणे हे शिकवते. त्यांनी असे अनेक महान कार्य केले आहे की, ज्यामुळे हिंदू धर्माला एक गौरवशाली इतिहास लाभलेला आहे.

भजु दिन बंधू दानव, दैत्यवंश निकनंदन,

रघुनंद आनंदकंद कौशलचंद दशरथ नंदन 

सभी को राम नवमी की हार्दिक हार्दिक शुभकामनाये !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या