Heatstroke, Summer temperatures उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी, उष्माघात म्हणजे काय? कारण व उपाय, काय करावे? काय करू नये?

                    



उष्माघात म्हणजे काय? कारण व उपाय

               मे महिन्यात उन्हाची प्रचंड तीव्रता वाढली आहे. सकाळच्या वेळेस कडक ऊन पडत आहे. त्यामुळे कडक उन्हात घराच्या बाहेर पडणे कठीण झाले आहे. तीव्र उन्हाचा त्रास होत असून उष्माघात रुग्णांची संख्या वाढलेली पहावयास मिळत आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासाठी आपण काही अधिक पुढीलप्रमाणे खबरदारी घेतली पाहिजे.

  • घरात हवा खेळती ठेवावी.
  • हवा खेळती ठेवण्यासाठी एअर कंडिशनर वापरावा.
  • एसी (एयर कंडिशनर) नसेल तर पंखा वापरा. 
  • घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात.


उष्माघात म्हणजे काय? कारण व उपाय

उष्माघात हा लहान मुलांना, वृद्ध व्यक्तींना, आजारी व्यक्तींना, मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तींना होतो. उष्माघात हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधी असलेल्या व्यक्ती, लठ्ठ व्यक्ती, मूत्रपिंडाचे आजार असणारी व्यक्ती यांना सहज उष्माघात होऊ शकतो. आपण सगळेच उन्हामध्ये जातो परंतु काही जणांना उष्माघातामुळे मृत्यू होतो.

                 आपल्या शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस असते. या तापमानात शरीरातील सर्व अवयव काम करू शकतात. घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर 37°c तापमान कायम राहते. असा सतत घाम निघत असताना पाणी पित राहणे हे खूप गरजेचे आहे. पाणी शरीरात इतरही काही महत्त्वाची कामे करत असतो. त्यामुळे शरीरातील पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं कमी करते. जेव्हा बाहेरचे तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाते आणि शरीरातील कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते. तेव्हा शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागते. शरीराचे तापमान ज्यावेळेस 42 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागते. तेव्हा रक्त तापू लागते आणि रक्तातील प्रोटीन अक्षरश: शिजू लागतात. ज्या पद्धतीने उकळत्या पाण्यामध्ये अंडी उकळतात तसे रक्तातील प्रोटीन उकळतात.

           स्नायू आखडून कडक होऊ लागतात. त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात. रक्तातले पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होते. ब्लड प्रेशर अत्यंत कमी होतो. महत्त्वाच्या अवयवांना विशेषतः मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे माणूस कोमात जातो व त्याचा एक एक अवयव काही कालावधीत बंद होत जातात व त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. मुले किंवा वृद्ध व्यक्ती बिशुद्ध झाल्यास त्यांच्या तोंडावर थोडे पाणी शिंपडावे. त्यांच्या श्वसनक्रियेची तपासणी करावी. नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला असेल तर नाकाच्या मांसल भागावर दहा मिनिटे प्रत्यक्ष दाब दिल्यास रक्तस्त्राव थांबतो. शुद्धी आल्या नंतर आरामदायी थंड ठिकाणी ठेवावे. शरीरात वाढलेली उष्णता प्रथम कमी करावी व रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत करणे हाच प्रथमोपचार फायद्याचा ठरतो. त्यास थंड व सावलीच्या ठिकाणी बसवावे. शरीरावरील जास्त कपडे असतील तर कमी करावेत. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते. व उष्माघातापासून होणारा त्रास कमी होईल. त्या व्यक्तीचा जीव आपण वाचवू शकतो. उष्माघातापासून वाचण्यासाठी आपण काय केले पाहिजे व काय न केले पाहिजे.


                             हे करू नये 

  • दुपारी 11 ते 4 या वेळेत उन्हाळ्यात फिरू नये. 
  • मद्य, चहा, कॉफी, कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स व उष्ण पदार्थ खाणे देणे. खूप डीहायड्रेशन होते.
  • शीतपेय ऐवजी लिंबू सरबत किंवा नारळ पाणी प्यावे.
  • आहारात तेलकट, तिखट, आंबट, मसालेदार पदार्थ, मांसाहार, मद्य इत्यादी पदार्थ टाळा. जास्त अन्न खाऊ नये.
  • उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये.
  • उन्हातून आल्यानंतर फ्रीजमधील पाणी पिऊ नये.
  • गडद रंगाची कपडे वापरू नयेत. 
  • प्लास्टिकच्या वस्तू वापरू नयेत.
  • प्रवास करताना वाहनांमधून लहान मुले किंवा वयोवृद्ध खाली जाऊ देऊ नये.

            

                                 हे करावे 

  • तहान नसतानाही पाणी प्या. सारखे थोडे थोडे पाणी पीत राहावे. प्रवास करताना नेहमीच पाणी घ्या.
  • आपल्या शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस कसे राहील याची दक्षता घ्यावी.
  • शक्यतो सुती, सौम्य किंवा पांढऱ्या रंगाची कपडे वापरा.
  • बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
  • अशक्तपणा, अशक्तपणा, कमजोरी, जास्त मळमळ वाटत असेल तर त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्या.
  • दिवसाच्या सर्वात जास्त तापलेली वेळ 11 ते 4 यावेळी सावलीच्या ठिकाणी थांबावे.
  • आपले घर उघडे ठेवा, पडदे, झडपा इत्यादी उघडे ठेवा.
  •  खिडक्या उघड्या ठेवाव्यात. 
  • डोके, गळा, चेहऱ्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करावा.
  • ओ.आर.एस., सरबत, ताक, लस्सी, थंड पेय आवश्यकतेनुसार घ्या.
  • फॅनचा वापर करावा.
  • थंड पाण्याने अंघोळ करावी.
  • कुटुंबातील लहान मुले व वृद्ध व्यक्तींवर लक्ष ठेवा. कारण उष्णतेसंबंधी आजार उद्भवू शकतात.
  • पशु पक्षांना पाणी पिण्यासाठी मोकळ्या जागी भांडे भरून ठेवावे.
  • शेतातील कामे सकाळी सात ते अकरा व चार ते साडेसहा वाजेपर्यंत करावीत.
  • काम करत असताना मध्ये थोडा वेळ थांबून पाणी प्यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या