अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण मानला जातो. हा सण वैशाख महिन्यातील तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. नवीन सुरुवात करण्यासाठी हा दिवस पवित्र मानला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी हा अक्षय तृतीयाचा मुहूर्त हा पवित्र मानला जातो. सोने खरेदी करण्यासाठी व नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अक्षय तृतीयेपासून वसंत ऋतूची सुरुवात होते.
अक्षय तृतीया
अक्षय राहो आरोग्य आपले,
अक्षय राहो सुख आपले,
अक्षय राहो नाते आपले,
अक्षय राहो प्रेम आपले.
अक्षय तृतीयेचे महत्त्व
- महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना हद्दपार करण्यासाठी अक्षय तृतीयेला अक्षय पत्र दिले.
- अक्षय तृतीयेला अन्नपूर्णा देवीचा जन्म झाला.
- भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म अक्षय तृतीय दिवशी झाला.
- अक्षय तृतीयेला गंगा नदी देवाच्या भूमीत आली.
- अक्षय तृतीयेला कुबेराने लक्ष्मी देवीचे पूजन केले.
0 टिप्पण्या