Nature निसर्ग माझा सोबती

        निसर्ग माझा सोबती



माझे बालपण निसर्गरम्य परिसरात गेले. नेहमीचे सोबती मला दुर्मिळ असत. पण मला कधीही कंटाळा येत नसे. तर घराबाहेर बागेत मला अनेक सोबती भेटतात. झाडे, पाने, फुले, फुलावरून भिरभिरणारे फुलपाखरू, झाडावरून वर खाली करणारी खार, उन्हात बसलेली मांजर, घराचा रखवालदार मोती हे सर्व माझे सोबती आहेत. यांच्या सहवासात माझे बालपण कसे संपले हे मला कळलेही नाही. त्यामुळे मला मी सगळ्याबद्दल खूपच आपलेपणा वाटत असतो. जो आपल्या हिताचा विचार करतो. वाईट मार्गापासून परावृत्त करतो. तोच माणसाचा खरा सोबती असतो. तसं पाहिलं तर निसर्ग हाच माणसाचा खरा सोबती आहे. माणूस भटक्या वृत्तीचा असतो. काही माणसाच्या वाटेला भटके जीवन येते. तेव्हा झाडे माणसाला सावली देतात. भूक भागवण्यासाठी अन्न देतात, तहान भागवण्यासाठी नदी पाणी देते. त्यामुळे माणूस स्थिर झाला. शेती करू लागला. भूमीने माणसाला भरपूर धन धन्य दिले. माणसाच्या प्रत्येक सुखात निसर्गाचा हातभार लागला आहे. माणसाने आपल्या बुद्धीने आपली प्रगती साधली. त्यात खरी साथ दिली ति निसर्गाने भूमीच्या पोटातून इंधन मिळवले. साधारण माणसाला मीठ व मासे यामुळे माणसाच्या आहारात तर लज्जत आली. निसर्गाने माणसाचे भूक भागवली. तसेच त्याच्या आरोग्याची ही सगळी काळजी घेतली. आजही आयुर्वेद विविध वनस्पती औषधासाठी वापरत आहे. नदी व सागराच्या साह्याने माणूस खूप प्रवास करू शकतो. आज वैद्यकीय क्षेत्रात नाना प्रयोग केले जातात. विविध असाध्य रोगापासून माणसाची मुक्तता करण्यासाठी या औषधाने यश शोधण्यासाठी केले जातात. अर्थात हे सारे प्रयोग वनस्पती व  प्राण्यावर केले जातात. त्यात यश मिळाले की फायदा झाला माणसाचा. मग सांगा निसर्ग सच्चा सोबती नाही का ?

                         जसें न ऋण फिटे जन्मतेचे, 

                         तसे न ऋण फिटे निसर्गाचे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या