Solapur water सोलापूरला पिण्यासाठी उजनीतून पाणी सोडले



सोलापूर जिल्ह्याची वरदायनी उजनी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. सोलापूर शहर (महानगरपालिका) पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, शिरभावी पाणीपुरवठा योजना इत्यादी व भीमा नदीकाठची सर्व गावे व शहरे यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी आज दिनांक 10 मे 2024 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता उजनी धरणातून 1500  क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार पाण्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आलेली आहे. दुपारी 12.30 वाजता 3000 क्यूसेक  पाणी सोडण्यात आलेले आहे. दुपारी 2.30 वाजता 4000 क्यूसेक पाणी सोडण्यात आलेले आहे. सायंकाळी 4.30 वाजता 6000 क्युसेक पाणी सोडण्यात आलेले आहे. हे पाणी सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औंज बंधाऱ्यात पोहचेपर्यंत सोडण्यात येणार आहे. यासाठी किमान 8 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. नदीपात्रातून पाणी लवकरात लवकर पाणी औंज बंधाऱ्यापर्यंत पोहोचावे. यासाठी पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करून 6000 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरणात सध्या उणे 48% पाणीसाठा आहे. मृत साठ्यापैकी 24 टीएमसी पाण्याचा वापर आतापर्यंत करण्यात आलेला आहे. एकूण शिल्लक साठा 39 टीएमसी एवढा असून त्यातून 5 टीएमसी पाणी सोडल्यानंतर धरणामध्ये फक्त उणे 55% पाणीसाठा उपलब्ध राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या