कर्ज वाटपात शेतकऱ्यांची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्यावी!
बीडचे पालकमंत्री मा. श्री. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक गुगल मीट द्वारे पार पडली. यावेळी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान जिल्ह्यातील महत्वाच्या मुद्द्यावर बैठकीत सूचना केल्या.
महावितरणच्या उर्वरित कामाबाबत आढावा घेत असताना शासनकडून राबविण्यात आलेल्या सिंगल फेज गाव फिडर योजनेच्या काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या. या योजनेमुळे माजलगाव मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल.
दुष्काळ, पाणी टंचाई, चारा टंचाई याबाबत आराखडा बनवून नियोजन करणे आणि सध्याची परिस्थिती याबाबत आढावा घेण्यात आला. पुढील काही दिवसात पेरणी सुरु होईल, शेतकऱ्यांना बी - बियाणे, खते याचा तुटवडा पडणार नाही याची दक्षता घेऊन. कुठेही शेतकऱ्यांची लूट होणार नाही याची काळजी घ्यावी. तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यास प्रशासनाने कुठलीही हयगय करू नये. कर्ज वाटपबाबत दिलेले उद्दिष्ट बँकांनी विहित वेळेच्या आधी पूर्ण करून शेती मशागतीसाठी, पेरणीसाठी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात यावे याबाबत सूचना केल्या.
0 टिप्पण्या