मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे व आमदार किशोर दराडे यांच्या सोबतच्या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले
नाशिक विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या पुढाकारातून
मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिक्षक सर्व संघटना प्रतिनिधीच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले असून अनेक प्रश्नांना चालना मिळाली आहे.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, माध्यमिक कमवी संघटनेचे पदाधिकारी व माननीय आमदार किशोरजी दराडे यांची सकाळी माननीय कृषिमंत्री मा. श्री. दादाजी भुसे यांच्या जंजिरा या बंगल्यावर सकाळी झाली साधक बादक चर्चा झाली. अंशता टप्पा अनुदानासंदर्भातल्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भाची संपूर्ण माहिती श्री अनिल परदेशी यांनी मा. शिक्षक आमदार श्री किशोरजी दराडे यांना पोट तिडकीने मांडून सोडविण्याबाबत विनंती केली. यानंतर दुपारी 2.15 ते 4.15 या प्रदीर्घ वेळेत मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. 2005 पूर्वी नियुक्त पण 2005 नंतर 100 % अनुदान टप्पा मिळालेल्या शिक्षकांना जुनी पेंशन लागू करण्यास मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे पूर्णपणे सकारत्मक असून आचारसंहिता संपताच काही दिवसात हा प्रश्न निकाली लागणार आहे. यासाठी शासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे दिले. तसेच 2005 नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देण्यासाठी कमिटी स्थापन करून त्यावर शासन निर्णय घेईल असेही मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले.
20 % व 40 % वेतन अनुदान घेणाऱ्या माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजसाठी वाढीव 20 % टप्पा वाढ व नैसर्गिक पद्धतीने नियमितपणे टप्पे देण्याचे मान्य केले असून येणाऱ्या अधिवेशनात या संदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याचबरोबर 30 दिवसात राज्यातील त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांचा विषय हा लवकर शासन निर्णय निर्गमित करून सोडविण्यात यावा. पुणे स्तरावरील प्रलंबित असलेले प्रस्ताव हे अनुदानासाठी घोषित करून त्या शाळांना देखील टप्पा अनुदान देणे. शेवटच्या वर्गाच्या पट संख्येची अट शिथिल करून अशा वर्ग तुकड्यावरील शाळातील कर्मचाऱ्यांना दिलासा देणे.या अनेक विषयांवर बोलण्याची संधी नाशिक विभागाचे श्री अनिल परदेशी यांना देण्यात आली. मा. मुख्यमंत्री व मा.शिक्षणमंत्री यांनी अंशतः अनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर लवकरात लवकर शिक्षकांचे सगळेच प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास दिला.
आदिवासी आश्रम शाळेचे पगार नियमित करण्यात येतील, अशा सूचना देऊन त्यांची वेळ येत्या जूनपासून 11 ते 5 अशी करण्याची घोषणाही मुख्यमंत्री महोदयांनी केली. विनाअनुदानितवरुन अनुदानितवर बदली, मान्यता आणि शालर्थ आयडी ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महत्वाचे म्हणजे, आश्रमशाळेचा ग्रेड पे सातव्या वेतन आयोगानुसार 4400 वरुन 4800 वर करण्याचा निर्णय घेऊन परिपत्रक आजच निर्गमित करण्यात आले. सर्व अनुदानित शाळा व आश्रम शाळाना कला व क्रीड़ा शिक्षकांची पदे भरण्याचे त्वरित मान्य केले. नाशिक जिल्ह्यासह विभागातील 1043 शिक्षकांची रखडलेली फरक बिले त्वरित काढावेत असा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. सातव्या वेतन आयोगानुसार वेतनेत्तर अनुदान देण्यास मा. मुख्यमंत्री अनुकूल असून यावरही कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
- जूनी पेन्शन योजनेचा प्रश्न आचारसंहितेंनंतर मार्गी लावणार
- 30 दिवसात राज्यातील त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांचा विषय हा लवकर शासन निर्णय निर्गमित करून सोडविण्यात यावा.
- येणाऱ्या अधिवेशनात टप्पावाढीचा निर्णय घेणार
- आश्रम शाळेच्या वेळेत बदल करणार
- आश्रम शाळांसाठी 4400 वरून 4800 ग्रेडपेला मान्यता
- माध्यमिकप्रमाणे आदिवाशी विभागाचे पगार 1 तारखेलाच होणार
- शिक्षकांचे मेडिकल बिले कॅशलेस करणार
शिक्षकांच्या आजच्या बैठकीला मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे,शिक्षणमंत्री मा.दीपकजी केसरकर,कृषीमंत्री मा. दादासाहेब भुसे,पाणीपुरवठा मंत्री मा.गुलाबराव पाटिल उद्योगमंत्री मा.उदयजी सामंत व गृहराज्य व शालेय शिक्षणराज्य मंत्री शुंभराजे देसाई आणि नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे, मुख्याध्यापक संघ व टीडीएफ पदाधिकारी उच्च माध्यमिक कमवी शिक्षक शिक्षक क्षेत्र संघटनेचे राज्य सचिव श्री अनिल परदेशी, श्री.करतारसिंग ठाकूर, श्री.गुलाबरावजी साळुंखे, श्री.प्रकाशजी तायडे, श्री.राहुल कांबळे, श्री.अरुणजी पाटील, श्री.गौरवजी कोळी, श्री.रवी पवार, श्री.किशोरजी हिरे, श्री अर्जुन करपे तसेच टीडीएफचे नाशिक विभाग कोषाध्यक्ष श्री मोहन चकोर, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री एस.बी.देशमुख, शिक्षक संघटना नेते डॉ. श्री सुधीर जाधव, शिक्षक नेते श्री संभाजी पाटील, श्री शैलेश राणे, जुनी पेंशन योजनेचे नेते श्री दिगंबर नारायणे, श्री अशोक सोमवंशी, अमरावती विभागाच्या सौ. संगीताताई शिंदे, श्री महेंद्र हिंगे,उपाध्यक्ष श्री प्रदीप सांगळे, श्री बी.के.नागरे, श्री दिनेश देवरे, सौ माधुरी मेटेंगे, श्री बंडू मखरे, श्री निलेश गांगुर्डे, सुदर्शनाताई, त्रिगुणाईत तसेच नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आदी नाशिक विभागातून मोठ्या प्रमाणात यावेळी बैठकीला मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.
0 टिप्पण्या