टाकाऊ वस्तु पासून सुंदर असा बंगला
पुणे येथील रहिवाशी श्री. इनामदार यांनी टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या पासून सुंदर असा बंगला बांधला आहे. त्यांनी जवळपास 3 वर्षात लोकांनी पाणी पिऊन फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या 1 लिटरच्या बाटल्या जमा केल्या. त्यांच्या कुटुंबीयांनी देखील प्लास्टिकच्या एक लिटरच्या बाटल्या गोळा करण्यामध्ये मदत केली. गोळा केलेल्या पाण्याच्या बाटल्यामध्ये माती भरली. घराच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या विटा ऐवजी त्यानी माती भरलेल्या बाटल्यांचा उपयोग केला. यामुळे घर बांधण्यासाठी येणारा खर्च कमी झाला. सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या त्यांच्या प्लॉट वर दुमजली भुजंग इमारत बांधली आहे. त्यापासून फायदा असा झाला की,
1. बांधकाम खर्च निम्मा झाला.
2. प्लास्टिकच्या बाटल्या मुळे होणारे प्रदूषण थांबले.
3. विटा भाजताना लागणारी heat energy वाचली.
4. विटा भाजताना होणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण थांबले.
0 टिप्पण्या