Baldindi प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या बाल दिंडीने भक्तिमय वातावरण

प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या बाल दिंडीने भक्तिमय वातावरण



              पेहे ते करकंब रोडवरील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, पेहे (ता. पंढरपूर) च्या प्रांगणात टाळ मृदंगाच्या ग्यानबा तुकारामच्या जय घोषाने वातावरण दुमदूमलले आणि आषाढी वारीसाठी कोणती तरी दिंडी आली असेल या भावनेने सर्वांचे लक्ष वेधले. पण ती कोण्या संतांची दिंडी नव्हती तर ती होती  प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पेहे या शाळेने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर  काढलेली बाल दिंडी. या बाल दिंडीचे स्वागत माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम खेळून केले .

               हातात भगवा पताका घेऊन सामील झालेले बाल वारकरी, त्यामागे टाळकरी, वारकरी वेशभूषेतील विद्यार्थी, त्यामागे डोईवर तुळशी वृंदावन व श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती घेऊन चालणारे विद्यार्थिनी, त्यांना शिस्तीत घेऊन जाणारे शिक्षक वृंद आणि हरिनामाचा गजर करत ती बाल दिंडी. या बालदिंडीने एक फेरी पूर्ण केल्यानंतर प्रशालेच्या प्रांगणामध्ये गोल रिंगण आखून त्यामध्ये रिंगण सोहळा पार केला. विद्यार्थिनी तसेच शिक्षिका यांनी फुगडी खेळली. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला.

               या बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे उद्घाटन प्रशालेचे प्राचार्य मा. श्री मारुती गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी  प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय टरले , श्री तानाजी पवार, श्री मदनकुमार चव्हाण, श्री रामदास कोलगे, श्री रामचंद्र भोसले, श्रीम. स्नेहल देशपांडे, श्री सुग्रीव अमराळे, श्री श्रावण शिंदे, श्री दत्तात्रय जमदाडे, श्री नितीन भुसनर, श्री समाधान खारे , श्री राहुल बागल, सौ.शीतल पाटील, सौ. अंजली सांगोलकर, श्री योगेश गायकवाड, श्री अमृत वाघमारे, श्री कुलदीप गायकवाड तसेच पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या