पंढरपूरच्या आषाढी वारीचे परदेशात थेट प्रक्षेपण होणार
डिस्कवरी चैनलवर आषाढी वारीचे सादरीकरण करण्यासाठी आवश्यक असणारे प्रस्ताव सादर करावेत असा आदेश मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
डिस्कवरी चैनल हे 1985 ते 1995 पर्यंत डिस्कवरी चैनल म्हणून ओळखले जात होते. आता ते डिस्कवरी म्हणून ओळखले जाते. वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी यांनी हे चॅनल सुरू केले आहे. त्याचे सीईओ डेव्हिड झास्लाव हे आहेत. त्यांनी सुरुवातीला डॉक्युमेंटरी टेलिव्हिजन प्रोग्रॅम सुरू केले होते. त्यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान व इतिहास यासंबंधी कार्यक्रम आयोजित करत होते. आता त्यामध्ये बदल झालेला असून वेगवेगळे कार्यक्रम डिस्कवरी चैनल वरती सादर केले जातात. पंढरपूरमध्ये आषाढी वारी निमित्त राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे आले असता त्यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची वारी संपूर्ण जगाला पाहता यावी म्हणून डिस्कवरी चैनलवर आषाढी वारीचे सादरीकरण व्हावे यासाठी आवश्यक असणारे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. जगाला हेवा वाटावा अशी पंढरपूरची आषाढी वारी आहे. लाखो वारकरी आषाढी वारीसाठी कित्येक किलोमीटर पायी चालत येत असतात.

0 टिप्पण्या