शिक्षक समन्वय संघाच्या वतीने प्रायोजित विविध मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाच्या मा.प्रधान सचिव यांच्याकडे पाठपुरावा
शिक्षक समन्वय संघाच्या वतीने प्रायोजित विविध मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाच्या मा.प्रधान सचिव यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. यावेळी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात मा. अर्थविभागाने काही निवडक माहिती मागवली होती. या संदर्भातील माहिती आज अथवा उद्यापर्यंत संकलीत होईल, अशी माहिती प्राप्त होता क्षणी दिरंगाई न करता पुर्ववत मागण्यांसंदर्भातील नस्ती अर्थ व नियोजन विभागास पाठवण्यात येणार आहे ,असे शालेय शिक्षण विभागाच्या एकंदरीत पाठपुराव्यातून स्पष्ट झाले आहे.
सदरील पाठपुराव्यासाठी पुणे शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार मा.जयंतजी आसगांवकर, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आ.अभिजीतजी वंजारी कोकण शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार मा.ज्ञानश्वेरजी म्हात्रे यांच्या समवेत शिक्षक समन्वय संघाचे समस्त समन्वयक उपस्थित होते.
0 टिप्पण्या