Organization of innovation competition for teachers शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन
त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्था, उत्तूर, ता. आजरा या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त (राज्यातील) प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये राबविलेल्या "नवोपक्रमावर आधारीत अहवाल" हे सदर स्पर्धेसाठी पाठवायचे आहेत. आपली शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी आपण नेमके काय केले ? कमी वेळेत अधिकाधिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सदर उपक्रमात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव केला होता ? आपला उपक्रम अन्य शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमापेक्षा कसा वेगळा होता? तो उपक्रम राबविण्यासाठी आपण कोणत्या व्यक्तींची आणि संदर्भ ग्रंथांची मदत घेतली ह्या सर्व गोष्टींचे सविस्तर वर्णन आपल्या अहवालात करावयाचे आहे.
आपले नवोपक्रम दोन प्रतीत ३० जून २०२४ तारखेपर्यंत प्रा. श्रीकांत नाईक मोबा. ९४०५०३९५०० यांच्याकडे पाठवायचे आहेत. प्राप्त नवोपक्रमांचे परीक्षण करून गुणवत्तेनुसार प्राथमिक शिक्षकांचे ३ व माध्यमिक शिक्षकांचे ३ असे क्रमांक काढले जातील व त्या यशस्वी शिक्षकांचा आकर्षक पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.
स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. श्रीकांत नाईक यांच्याकडे संपर्क साधावा. ह्या स्पर्धेत अधिकाधिक प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रा. श्रीकांत नाईक यांनी केले आहे.
शिक्षकांच्या नवोपक्रम स्पर्धा आणि अहवाल लेखन
बदलत्या काळाबरोबर शिक्षण क्षेत्रात नवे विचार, नव्या संकल्पना निर्माण होत आहेत. अशा स्थितीत जुन्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार अवश्य करावा. पण कालबाह्य झालेल्या अशा गोष्टींचा डोळसपणे त्याग करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे.
प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या समस्यांचा शोध घेऊन जागरूक शिक्षक त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न आपल्या परीने नेहमीच करीत असतात. आपले अध्यापन परिणामकारक होण्यासाठी त्यांची आवश्यकताही असते. असे प्रयत्न नियोजनबध्द व शास्त्रीय पध्दतीने करणे यालाच संशोधन प्रकल्प, प्रयोग, किंवा नवोपक्रम असे म्हणतात.
प्रत्यक्ष संशोधन चालू असताना प्रयोग काळात आलेल्या अनुकूल किंवा प्रतिकूल अनुभवांच्या नोंदी ठेवाव्या लागतात आणि या नोंदी विचारात घेऊन त्यांच्या आधारे निष्कर्ष काढावयाचे असतात. त्या निष्कर्षांचा अर्थ लावावा लागतो आणि संशोधन पूर्ण झाल्यावर नवोपक्रम स्पर्धेसाठी विशिष्ट पद्धतीने अहवाल लेखन करावे लागते.
नवोपक्रमाच्या अहवालाची गरज
१. संशोधनातील चांगल्या गोष्टी शाळेच्या नेहमीच्या कार्यक्रमात शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उपयोगी पडतात
२. या अहवालाचा उपयोग सारख्याच परिस्थितीत काम करणाऱ्या इतर शाळांना त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी होतो.
३. अशा अहवाल लेखनामुळे नावीन्यपूर्व कल्पना पुढे येतात.
४. प्रकल्पाचे यशापयश समजल्यामुळे इतर शाळांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचतो.
५. साचेबंद. रूक्ष पारंपारिक पद्धतीला पायबंद बसून शिक्षकांच्या सृजनशीलतेला वाव मिळतो.
नवोपक्रमाच्या अहवालाची रूपरेषा
प्रकल्प राबवून पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचा अहवाल साधारणपणे पुढील गोष्टी विचारात घेऊन लिहावा. प्रकल्पाच्या स्वरूपानुसार प्रकल्पक यात किरकोळ बदल करू शकतो.
१. मुखपृष्ठ
मुखपृष्ठावर ठळक मोठ्या अक्षरात प्रकल्पाचे नाव, शाळेचे नाव व प्रकाशनाचे वर्ष इत्यादी माहिती आकर्षकरित्या लिहावी.
२. पहिले पृष्ठ
या पृष्ठावर अनुक्रमणिका लिहून तिच्यात अहवालात लिहिलेली प्रकरणे (मुद्दे) आणि शेवटी परिशिष्टे आणि संदर्भ पुस्तकांची यादी लिहावी. त्यानंतर पुढच्या पृष्ठावर नवोपक्रम लिहिण्यास सुरूवात करावी.
३. प्रस्तावना
प्रकल्पासाठी हाती घेतलेल्या प्रश्नाचे सर्वसामान्य स्वरूप लिहावे. प्रकल्प राबविण्याची असलेली आवश्यकता थोडक्यात लिहावी.
४. प्रकल्पाची गरज
कोणत्या समस्येतुन प्रकल्पाचा उगम झाला हे नमूद करावे त्यामागील पार्श्वभूमी आणि वैयक्तिक अनुभव लिहावेत. आपण हाती घेतलेल्या विषयावर यापूर्वी संशोधन झाले नाही. म्हणून आपल्या संशोधनाचा प्रयत्न होता हे स्पष्ट करावे.
५. प्रकल्पाची उद्दिष्टे
प्रकल्पाची व्याप्ती आणि मर्यादा विचारात घेऊन उद्दिष्टे लिहावीत. ही उद्दिष्टे क्रमाक्रमाने, नेमक्या शब्दांत आणि सोप्या भाषेत लिहावीत.
६. प्रकल्पाची व्याप्ती व मर्यादा
या भागात आपण नेमके कोणते संशोधन केले ते लिहावे. (त्याचप्रमाणे त्यासाठी काम करण्याच मर्यादा, दिलेला वेळ आणि आर्थिक साह्य लक्षात घेऊन प्रकल्पाची व्याप्ती ठरविलेली असा व्याप्ती वाढविल्यास प्रकल्पाची गुतांगुत वाढत जाते. म्हणून आवश्यक असलेला नेमका भागच सदरात लिहावा. आपण काय केले व काय केले नाही हे स्पष्ट करावे.
७. प्रकल्पात वापरलेली साधने
प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आपण कोणत्या साधनांचा उपयोग केला ते लिहावे. अभिप्राय इत्याद उपयोग केला असल्यास ते लिहावे, तसेच ज्या साधनांच्या द्वारे ही उत्तम माहिती मिळविली साधने लिहावीत.
८. प्रकल्पाची कार्यपद्धती
ही प्रकल्पाच्या स्वरूपावर अवलंबून असते. आपण कोणती माहिती गोळा केली, तिच्या आधी कार्यपद्धती अवलंबून असल्यामुळे त्यांचाही कटाक्षपूर्वक विचार अहवाल लेखनात या विभागात करावा.
९. माहितीचे पृथक्करण
प्रकल्प राबविताना आपण केलेल्या माहितीचे संकलन आणि ठेवलेल्या नोंदी यांचे पृथक्करण कन लागते. लहानशा उद्दिष्टांची माहिती वेगवेगळी करून दाखविण्यासाठी पृथक्करणाची आवश्यक असते. अशा पृथक्करणामूळे प्रकल्पाचे विविध पैलू खुलवून दाखविता येतात. तसे ते खुल दाखवावे, याचबरोबर तक्ते, आलेख क्रमबद्ध मांडून सांख्यिकी किंवा गुणात्मक पद्धतीने च करावी.
१०. निष्कर्ष व शिफारशी
उद्दिष्टांना धरून अनुमाने व अनुमानांना धरून निष्कर्ष काढलेले असावेत. प्रकल्पाची कसोटी येत असते. अभ्यासातून शोधून काढलेली वस्तुस्थिती आणि प्रकल्पकाने त्याचा स्वता लावलेला अ नमूद करावा हे निष्कर्ष अनुकूल किंवा प्रतिकूल असले तरी ते स्पष्टपणे मांडावेत. प्रकल्प उपयुक्तता आणि गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी शिफारशी आवश्यक असतात. त्याचप्रमाणे विषय मर्यादा ध्यानात घेऊन त्या केलेल्या असाव्यात.
११. अनुधावन
या भागात प्रकल्पाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली ते लिहावे तसेच त्यात कोणत्या उणीवा राहिल्या त्याचबरोबर चिकित्सा निष्कर्ष शाळेत कसे राबविता येतील याचे विवेचन उल्लेख करावा.
१२. परिशिष्ट
वरीलप्रमाणे अहवाल लेखन पूर्ण केल्यावर शेवटी पुढील प्रमाणे परिशिष्टे लिहावी. अ) संख्याशास्त्र आकडेमोड आ) अहवालात लिहिता न येणारी विस्तृत माहिती इ) अभ्यासाठी वापरलेल्या विनि साधनांच्या प्रती ई) इत्यादी.
१३. संदर्भ
आपल्या प्रकल्पाच्या अभ्यासाच्या संदर्भात ज्या पुस्तकांचा उपयोग केला त्या पुस्तकांची यादी शेवटी थोडक्यात लिहावी.
वरील मुद्यांच्या आधारे योग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन तर्कशुद्ध अहवाल लेखन करावे. अहवाल भूतकाळात लिहावा. अक्षराचा टाईप अगर हस्ताक्षर आकर्षक असावे. हे लेखन फुलस्केप कागदाच्या एका बाजूस करावे. हा नवोपक्रम दोन हजार ते अडीच हजार शब्दांचा असावा. माध्यमिक शिक्षकांनी आपल्या नवोपक्रम निबंधाची बांधणी नीट करून घेऊन ते दोन प्रतीत दिलेल्या मुदतीत व प्राथमिक शिक्षकांनी आपले नवोपक्रम खालील पत्यावर सादर करावेत.
प्रा. श्रीकांत वाहन शर्वाणी,
११२५/१, पिराजी पेठ,
मु.पो.ता. गडहिंग्लज - ४१६५०२
मोबाईल ९४०५०३९५००
९४२१२०५४२७
0 टिप्पण्या