शिक्षण सप्ताहामध्ये विद्यांजलीच्या उपक्रमांबाबत यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व मंडळाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांना महत्वाच्या सूचना
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत परिपत्रक काढण्यात आलेले आहे. त्या उपक्रमाकरीता शिक्षण सप्ताहाबाबत केंद्र शासनाच्या प्रस्तावित कार्यक्रमाची माहिती विस्तृत स्वरूपात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी त्यांच्या पत्रात दिलेली आहे. शिक्षण सप्ताहामध्ये राबविण्याबाबत येणाऱ्या उपक्रमामध्ये दिनांक 28/07/2024 रोजी राबविण्यात येणाऱ्या समुदाय सहभाग दिवस (Cumminity Involvement Day) मध्ये विद्यांजली हा शाळा स्वयंसेवक व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
तसेच 7 व्या दिवशी दिनांक 28/07/2024 रोजी तिथी भोजन / स्नेह भोजन या विषयी केंद्र शासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये समाजातील दानशूर व्यक्ती व संस्था यांनी विविध प्रसंगाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी व संतुलित आहार द्यावयाचा आहे. विविध सण, सभारंभ, विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे वाढदिवस, 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन अशा विविध प्रसंगाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी व संतुलित आहार द्यावयाचा आहे. शाळांनी याचे वार्षिक वेळापत्रक तयार करावयाचे आहे.
शाळांना स्नेहभोजन देतांना खालील मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जावे.
- आहार हा संतुलित, आरोग्यदायी व विविध पोषक तत्थांच्या समावेश असणारा असावा.
- स्थानिक पालेभाज्या, फळभाज्या यांच्या आहारात समावेश केला जातो.
- ऋतुमानानुसार उपलब्ध होणारी फळे यांचाही समावेश करता येईल.
- आहारामध्ये जंक फुड, फास्ट फूड याचा वापर टाळावा. अशा आहाराच्या दुष्परिणामाबाबत विद्याध्यांमध्ये जनजागृती करावी.
- विद्यार्थ्यांना संतुलित आहार देण्यापूर्वी शिक्षकांनी तो खाण्यायोग्य व आरोग्यदायी असल्याची खातरजमा करावी.
- शिक्षकांनी विद्याथ्यांना हात धुणे, उत्तम मौखिक आरोग्य अशा आरोग्यदावी सववीबाबत मार्गदर्शन करावे,
वरील प्रमाणे राज्यामध्ये शिक्षण सप्ताहामध्ये विद्यांजलीच्या उपक्रमांबाबत यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व मंडळाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच विद्यांजलीच्या उपक्रमासाठी नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा नोडल अधिकारी यांनी उक्त उपक्रम राबवितांना केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा लागणार आहे. असे परिपत्रक डॉ. श्री महेश पालकर (शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य) यांनी प्रकाशित केले आहे.
0 टिप्पण्या