Work Planning कामाचे नियोजन

Work Planning कामाचे नियोजन



प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात आठवड्याभरात महिन्याभरात कोणती कामे करायची आहेत याचे सविस्तर यादी तयार केली पाहिजे व अशा प्रकारे ठरवलेली कामे नियोजित वेळेत पूर्ण केली पाहिजेत. अशा प्रकारे कामाची यादी करताना ज्या कामांना आपल्याला प्राधान्य द्यायचे आहे अशा कामासमोर एका विशिष्ट प्रकारची खून करून ठेवावी. जी कामे कमी महत्त्वाचे आहे व नंतर करण्यासारखे आहेत त्यांच्यासमोर आणखीन वेगळ्या प्रकारची खून करून ठेवावी.

ज्या सभांना अथवा समारंभांना उपस्थित राहून फारसे काही साध्य होणार नसेल अशा सभांना अथवा समारंभांना हजर राहण्याचे टाळावे. जे कामे आपण स्वतः न करता आपल्याच साहेबाकडे सोपवली तरी चालू शकते अशा प्रकारची कामे आपल्या साहित्याकडे सोपवावी. प्रत्येक काम स्वतः करण्याचा अट्टाहास करू नये. हत्ती होऊन लाकडे वाहण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी हे तत्व लक्षात ठेवावे. 

एखाद्या गोष्टीबाबत निर्णय घ्यायचा असेल व तो स्वतः घेणे कठीण वाटत असेल तर इतर दोन-तीन तज्ञ लोकांशी याबाबत चर्चा करावी. मात्र ही चर्चा दोन अथवा तीन लोकांपेक्षा अधिक लोकांशी करू नये. कारण जितक्या जास्त लोकांशी तुम्ही चर्चा कराल तितक्या वेगवेगळी मध्ये वसले आपल्याला मिळत राहतील. कारण प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला सल्ला देताना आपल्या बुद्धीनुसार विचार करून सल्ला देत असतो. त्यामुळे तीन पेक्षा जास्त लोकांशी चर्चा केल्यास आपल्याला परस्परविरोधी अनेक प्रकारचे सल्ले ऐकावयास मिळतात. 

आपल्याकडे आपले सहाय्यक कर्मचारी काही प्रश्न घेऊन येत असतील तर ते प्रश्न कसे सोडवावेत याबाबत आपले मतप्रदर्शन करण्यापूर्वी ज्यांनी आपल्याकडे प्रश्न आणले अशा लोकांनाच त्याबाबतचे उत्तरे सुचवायला सांगावे व अशाप्रकारे आपल्या साहेब कर्मचाऱ्यांना त्याचे प्रश्न स्वतःचे स्वतः सोडवण्यास प्रोत्साहन द्यावे.

आपल्यासमोर एखादा प्रश्न अथवा समस्या निर्माण झाल्यास त्याच्या मूळ कारणांचा शोध घ्या. त्या समस्येवरील विविध पर्यायी उपाययोजना शोधून काढा व त्यातील उत्कृष्ट अशा पर्यायाची निवड करून ती समस्या सोडवा. मात्र अशी एखादी समस्या निर्माण झाल्यास दिवसभरात त्या समस्येचा विचार करत टेन्शन खाली जगू नका. तर ती समस्या तेवढ्यापुरती मनात ठेवून त्याच्यावर उत्तर शोधून तो प्रश्न मनातून काढून टाका व आपल्या दैनंदिन महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

दिवसभरात केलेल्या कामाचा रात्री झोपण्यापूर्वी आढावा घ्या व ती कामे करीत असताना आपल्याला अजून वेळ कुठे वाचवता आला असता याचा विचार करा. दुसऱ्या दिवशीच्या कामाच्या योग्य प्रकारे व वेळेवर हुकूम नियोजन करा. एक आठवडा अथवा एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर पुन्हा त्या आठवड्यात अथवा महिन्याभरात झालेल्या कामाचा आढावा घ्यावा. त्या आठवड्यापासून योग्य तो बोध घेऊन त्यांच्या पुढील कालावधीचे नियोजन करावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या