Comedy कॉमेडी म्हणजे काय? त्याचा अर्थ बऱ्याच लोकांना माहित नाही. तर त्याचा अर्थ आपण पाहूयात
बऱ्याच वेळा आपण बोलत असताना कॉमेडी या शब्दाचा वापर करत असतो, कॉमेडी हा शब्द ऐकत असतो त्याचबरोबर वाचत सुद्धा असतो. कॉमेडी हा इंग्रजी शब्द असून त्याचा मराठी मध्ये अर्थ आपल्याला माहीत नसतो. असे अनेक इंग्रजी शब्द आपण नेहमी बोलत असतो, वाचत असतो त्याचबरोबर ऐकत असतो. प्राचीन काळापासून कॉमेडी हा शब्द मनोरंजनासाठी वापरण्यात येऊ लागलेला आहे.
प्राचीन काळापासून मनोरंजनासाठी कॉमेडी या शब्दाचा वापर लेखन साहित्यामध्ये करण्यात येत होता. नाटके, कादंबऱ्या, कविता, चित्रपट, टीव्ही शो व मालिका इत्यादीमध्ये कॉमेडीचा वापर केला जातो. मग आपल्याला प्रश्न पडतो कॉमेडी म्हणजे काय? कॉमेडी म्हणजे सुखांतिका असा त्याचा अर्थ होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर विनोदी घटना किंवा हलके फुलके विनोद होय.
0 टिप्पण्या