Farmers scheme शेतऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पीक विमा, पीक कर्ज व इतर शासकीय लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत महिती भरावी

Farmers scheme शेतऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पीक विमा, पीक कर्ज व इतर शासकीय लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत महिती भरावी



                   शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद होण्यासाठी पूर्वी महसूल विभागाच्या माध्यमातून तलाठी पीक नोंद करून घेत असत. परंतु आज सर्वत्र ऑनलाईन तसेच हायटेक तंत्रज्ञान आलेले आहे. शेतीचा ७/१२ सुद्धा ऑनलाईन उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे शेतातील पिकाची नोंद करण्यासाठी महसूल विभागाने ई पीक पाहणी उपक्रम राबवला आहे. शेतातील हंगामनिहाय घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्या 'सातबारा'वर वस्तुनिष्ठ, अचूक व पारदर्शक नोंद व्हावी याकरिता राज्यात 'ई-पीक पाहणी' उपक्रम राबवण्यात आला आहे. यंदाच्या खरीप हंगामाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला असून १ ऑगस्ट २०२४ पासून १५ सप्टेंबर  २०२४ पर्यंत शेतकरी स्वतःहून आपल्या पिकांची अद्ययावत नोंद ७/१२ वर करणे चालू झालेले आहे.


ही नोंदणी कोठे करावी ?

  1. ई-पीक पाहणी करून आपले पीक आपल्या ७/१२ वर नोंद करण्यासाठी प्रथम मोबाईलवर प्ले स्टोअर वरून 'ई- पीक पाहणी याचे अद्ययावत ॲप डाऊनलोड करावे. 
  2. यानंतर पीक क्षेत्र निवडावे.
  3. त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव नमूद करावे.
  4. शेतकऱ्याचे गाव नमूद करावे.
  5. शेतकऱ्याचा गट क्रमांक नमूद करावा.
  6. अशी वैयक्तिक नोंदणी करून पिकांची माहिती अक्षांश-रेखांश यासह सचित्र अपलोड करायची आहे.


ई पीक नोंदणीचे वेळापत्रक

ई-पीक पाहणी १ ऑगस्टपासून सुरू झाली असून, शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत आपली पिके नोंद करता येणार आहेत. यानंतर १६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत तलाठी पीक फोटो नसलेले, चुकीच्या फोटो नोंदी, विहीत अंतराबाहेरील फोटो आदी पडताळणी सत्यापत करणार आहेत. यानंतर नोंद गाव नमुना १२ मध्ये प्रतिबिंबित होणार आहे."


नवीन ई  पीक ॲप मध्ये झालेल्या सुधारणा

• एकवेळ दुरुस्ती - नव्या व्हर्जनमध्ये शेतकरी आपल्या नोंदीत ४८ तासांत केव्हांही एकवेळ दुरुस्ती करू शकणार आहेत.

• एमएसपी नोंद- शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेत नोंद करावयाची का? असा प्रश्न त्यानुसार यात संधी आहे.

• तीन दुय्यम पिके यापूर्वी एक मुख्य व दोन दुय्यम पिके नोंदविता येत होती. आता तीन दुय्यम पिके क्षेत्रासह नोंदवणे शक्य आहे.

• मदत बटन आता शेतकऱ्यांना 'मदत' हे बटन उपलब्ध आहे, यात वारंवार विचारले जाणारे 'एफएक्यू प्रश्न व उत्तरे आहेत."


 ई पीक पाहणी का महत्वाची आहे ?

१) शासन राबवत असलेली पीकविमा योजना, पीककर्ज वाटप, नैसर्गिक आपत्ती मदत व शासनाची किमान आधारभूत किंमत योजना यासाठी पीक पेऱ्याची नोंद 'ई- पीक पाहणी' अँपवर नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे.

२) किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अर्थात एमएसपीसाठी नोंद केल्यास सदर पीक माहिती व नोंद आपोआप पुरवठा विभागाकडे परावर्तित होणार आहे.

                  शेतकऱ्यांच्या पिकांची अचूक नोंद ही शासन दरबारी व्हावी या उद्देशाने गेल्या वर्षापासून सुरु करण्यात आलेली ई-पीक पाहणीच्या यंदाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. अगदी मोबाईल ॲपपासून हा बदल असला तरी प्रक्रिया मात्र, सोपी आणि शेतकऱ्यांच्या सहज लक्षात येईल अशीच आहे. यापूर्वी महसूल विभागाच्या माध्यमातून सुरु असलेले हे काम आता शेतकरीच स्वतः करीत आहेत. त्यामुळे तत्परता आणि पीक पेऱ्याचे महत्त्वही शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. यंदा तर पीकविमा योजनेसाठी शासकीय विमा कंपन्यांचाच समावेश करण्यात आला होता. त्यामुळे नुकसान भरपाईदरम्यान याच 'ई-पीक पाहणी' नुसार भरपाई देण्याचा निर्णय झाल्याने ही नोंदणी प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची राहणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याने आपल्यावहीत क्षेत्रावर खरीप हंगामात घेतलेल्या पिकांची सात-बारावर नोंद होत असते. यापूर्वी अशा नोंदी तलाठी करत होते. मात्र, महाराष्ट्र शासनाने याला 'हायटेक' स्वरूप देत यात अधिक अद्ययावतपणा आणला. यासाठी प्ले स्टोअरवर 'ई- पीक पाहणी' हे ॲप उपलब्ध करून दिले. युजर फ्रेंडली असलेल्या या ॲपला आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर शेतकरी स्वतःच्या शेतातील उभ्या पिकांची अक्षांश-रेखांश आधारित सचित्र नोंद करू लागले आहेत. यानोंदीनुसार तलाठ्याची सत्यता पडताळणी करून पीक नोंदी सात-बारावर प्रतिबंधित करत आहेत. पाठीमागील वर्षी यात काही त्रुटी होत्या. यात तलाठी, कृषी सहाय्यक व शेतकऱ्यांनी केलेल्या सूचित केल्याप्रमाणे सुधारणा करत नवीन 'ई-पीक पाहणी व्हर्जन टू' हे ॲप यंदा उपलब्ध करून दिले आहे. यामुळे यात अधिक सुविधा व ऑप्शन्स प्राप्त झाले आहेत. यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अधिकाधिक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा महसूल, कृषी प्रशासनाने शेतकऱ्यांना केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या