Hotel हॉटेल म्हणजे काय ? त्याचा मराठीमध्ये अर्थ 99% लोकांना माहित नाही. चला तर आपण त्याचा अर्थ जाणून घेऊयात
आज आपण मराठी भाषेमध्ये बोलत असताना अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करत असतो. अशाच एका शब्दाचा अर्थ आपण आज पाहणार आहोत. मराठी भाषेमध्ये आपण नेहमी हॉटेल हा शब्द वापरत असतो. हॉटेल हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. त्याचा अर्थ "सराय" असा आहे. तसेच हॉटेल हा शब्द लॅटिन भाषेत हॉस्पेस वरून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ "अतिथी"असा आहे.
थोडक्यात हॉटेल म्हणजे पथिकाश्रम होय. हॉटेल म्हणजे खाजगी खोलीत राहण्याची करण्यात आलेली घरापासून दूर सोय होय. घरापासून दूर असलेले तात्पुरते घर म्हणजे हॉटेल होय. हॉटेलमध्ये सर्व सुख सुविधा उपलब्ध असतात.
0 टिप्पण्या