Kunabi maratha non creamy layer मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमीलेयर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमीलेयर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी



छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे. (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) बालचित्रवाणी इमारत, गोपाळ गणेश आगरकर रोड, सेनापती बापट रोडच्या मागे, पुणे (महाराष्ट्र) -४११००४ कडून मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमीलेयर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प २०२४-२५ साठी आयोजित केला आहे. तरी मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमीलीयर उमेदवारांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्पासाठी अर्ज करावेत.

1) सारथी विभागीय कार्यालयाचे नाव - पुणे विभागीय कार्यालय

  • मोडी लिपी प्रशिक्षण संस्था - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
  • शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण
  • कालावधी - ऑनलाईन ६० तास (०२ महिने)
  • एकूण विद्यार्थी संख्या - २०
2)सारथी विभागीय कार्यालयाचे नाव - सारथी उपकेंद्र कोल्हापूर

  • मोडी लिपी प्रशिक्षण संस्था - छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र- शिवाजी विद्यापीठ
  • शैक्षणिक पात्रता - कुठल्याही शाखेचा पदवीधर
  • कालावधी - ०६ महिने
  • एकूण विद्यार्थी संख्या - ५०

3) सारथी विभागीय कार्यालयाचे नाव - छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय

  • मोडी लिपी प्रशिक्षण संस्था - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर
  • शैक्षणिक पात्रता - कुठल्याही शाखेचा पदवीधर
  • कालावधी - मोडीलिपी सर्टिफिकेट कोर्स (०१ वर्ष
  • एकूण विद्यार्थी संख्या - ४०

                     सारथी संस्थेअंतर्गत उपरोक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडीलिपी प्रशिक्षण वर्गासाठी विद्यावेतन संस्थेद्वारे दिले जाईल. मोडीलिपी प्रशिक्षण अंतर्गत उपरोक्त अ.क्र. ०२ व ०३ विद्यापीठ जिल्हा मुख्यालयाच्या बाहेरील कागदपत्रे छाननी द्वारे अंतिमरित्या निवड झालेल्या उमेदवारांना प्रति विद्यार्थी रक्कम रु. १०,०००/- (दहा हजार फक्त) प्रतिमाह विद्यावेतन हे सारथी कडून देण्यात येईल. कोणत्याही उमेदवारास पूर्वलक्षी प्रभावाने (Retrospectively) आर्थिक सहाय्य अनुज्ञेय होणार नाही उमेदवाराची निवड ही उपरोक्त शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर करण्यात येईल.

                     परिपूर्ण माहिती, मार्गदर्शक तत्वे, ऑनलाईन अर्ज, अर्ज भरण्याकरिता सूचना व हार्ड कॉपी सादर करण्याचा पत्ता इ. दि. २३/०७/२०२४ पासून https://sarthi-maharashtragov.in>NOTICE BOARD>SHMS_MODILIPI- 2024-25 या लिंकवर उपलब्ध होईल. तसेच सदर लिंक दिनांक १५/०८/२०२४ पर्यंत खुली राहील. हार्ड कॉपी विभागीय

                     कार्यालयास सादर करण्याचा अंतिम दिनांक २०/०८/२०२४ हा राहील. उपरोक्त नमूद तारखेमध्ये बदल असल्यास सारथीच्या याच संकेतस्थळावर सूचित केले जाईल. वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली जाणार नाही, म्हणून सारथीची संकेतस्थळ पहावे.

ईमेल आयडी: sarthipune@gmail.com

वेबसाइट www.sarthi-maharashtra.gov.in/ 

फोन नंबर 020-25592502


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या