Pik anudan या पिकांना मिळणार अनुदान

या पिकांना मिळणार अनुदान


सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी द्वारे नोंदविलेले कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांनाच अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे. प्रति पिक प्रती हेक्टर ५००० रुपये जास्तीत जास्त २०००० रुपयेपर्यंत लाभ मिळणार असून अर्थसहाय्याचे वितरण शेतक-यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीव्दारे (PFMS) शेतक-यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणांच्या (DBT) माध्यमातून होणार आहे.

खरीप हंगाम सन २०२३ मधील ई पीक पाहणी नोंदणी झालेल्या कापूस व सोयाबीन पिकांच्या शेतकरी याद्या सर्व सेतू केंद्रावर उपलब्ध आहेत. तसेच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतक-यांना अदा करण्यासाठी शेतक-यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्याच्याकडून घेण्यात येणा-या संमती पत्र व सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र याबाबत नमुना अर्ज दिलेला आहे.

१) संमती पत्र

 सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरीत करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाचा नमुना यामध्ये सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पाहणी पोर्टलवर नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य या व कृषि विभागाच्या अन्य योजनांतर्गत अनुदान/सूविधा उपलब्ध करुन देण्याकरिता मी खाली सही करणार, या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करुन त्याआधारे बायोमेट्रीक आणि / किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळावयाच्या लाभासाठी आधार (वित्तीय व इतर अर्थसहाय्य, लाभ, सेवा यांचे लक्षित वितरण) अधिनियम, २०१६ नुसार संमती देत आहे. माझ्या आधार संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो. असे संमती पत्र अर्जदाराने सादर करायाचे आहे.

                             संमती पत्र नमुना अर्ज




२) ना हरकत पत्र देखील सर्व सेतू केंद्रावर उपलब्ध करून दिला आहे. तरी शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की सर्व संमती पत्र, सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र सादर करावयाचे आहे. सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई-पिक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेचा आम्हाला लाभ घ्यावयाचा आहे. आम्ही, जिल्हा संयुक्त खाते क्रमांक , तालुका गाव मधील चे हिस्सेदार आहोत. आम्हाला अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम, ही आम्ही सर्व संमतीने आमच्यातील सह हिस्सेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार सलंग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत. असे सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र अर्जदाराने सादर करायचे आहे.



          सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र अर्ज नमुना




३) आधार कार्ड झेरॉक्स सेल्फ आटेस्टेडसह १३ ऑगस्ट २०२४ पर्यंत आपल्या गावच्या कृषि सहाय्यक यांच्याकडे तात्काळ जमा करायाचे आहेत. अधिक माहिती साठी आपल्या गावाच्या कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांना संपर्क करावा. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या