Social media सोशल मीडिया ग्रुप अखिल भारतीय मराठा महासंघाचा स्नेह मेळावा

Social media सोशल मीडिया ग्रुप अखिल भारतीय मराठा महासंघाचा स्नेह मेळावा


             दररोज आपण सोशल मीडियाचा वापर करत असतो. सोशल मीडियाचे आपल्याला जेवढे फायदे आहेत तेवढे आपण केले पाहिजेत. याच भूमिकेतून "अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुका" या WHATS APP ग्रुपचा स्नेहमेळावा काल संध्याकाळी दौंड शहर येथे संपन्न झाला. या मेळाव्यासाठी ५०० सदस्यांनी आपली प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवली. यानिमित्ताने मास्तरांनाही बोलण्याची संधी मिळाली होती. अर्थात हे आपले होमग्राऊंड असल्याने संवादाला जास्त धार लावता आली. मराठा समाजबांधवांच्या काही महत्वाच्या प्रश्नांवर काही मतं स्पष्टपणे मांडता आली याचे समाधान आहे. अर्थात मा. राजेंद्रजी कोंढरे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये संघटनेला व उपस्थितांना नेमकी दिशा देण्याचा प्रयत्न केला.यानिमित्ताने आमदार राहुलदादा कुल,माजी आमदार रमेशआप्पा थोरात,माजी सभापती आप्पासाहेब पवार,जिल्हा परिषद सदस्य विरधवलबाबा जगदाळे, उल्हासजी मिसाळ,रवी पवार,राहूल डोंगरे यांनीही शुभेच्छा देताना चांगले मार्गदर्शन केले. 

               सूत्रसंचालक दिनेश पवार यांच्या अभ्यासपूर्ण सूत्रसंचालनाने हा मेळावा रंगतदार झाला.शैलेश पवार यांनी प्रास्ताविक केले तर प्रताप खानविलकरांनी आभार मानले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या