Baldindi पेहेच्या विद्यार्थ्यांची बालदिंडी: भक्तिरसात तल्लीन झाला संपूर्ण परिसर

Baldindi पेहेच्या विद्यार्थ्यांची बालदिंडी: भक्तिरसात तल्लीन झाला संपूर्ण परिसर

पंढरपूर (प्रतिनिधी):

पंढरपूर येथील पेहे ते करकंब रोडवरील प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य बालदिंडीने परिसरात अक्षरशः भक्तिमय उत्सवाचे स्वरूप आले. शाळेच्या प्रांगणात टाळ, मृदंग आणि “ग्यानबा-तुकाराम” च्या जयघोषात भरलेल्या वातावरणामुळे आषाढी वारीच्या पारंपरिक दिंडीचे दर्शनच घडल्यासारखे वाटत होते.

या विशेष बाल दिंडीचे उद्घाटन संस्थापक, प्राचार्य मा.श्री. मारुती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम खेळून केलेल्या स्वागताने झाली.

दिंडीचा शृंगार आणि भक्तीचा रंग

वारकरी वेशभूषेतील विद्यार्थी, भगव्या पताका हातात घेऊन, टाळ- मृदंगांच्या निनादात, 'हरी नामाचा गजर करत पुढे चालले होते. डोक्यावर तुळशी वृंदावन आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती घेऊन चालणाऱ्या विद्यार्थिनींचे दर्शन श्रद्धेने भरून टाकणारे होते. त्यांच्यासोबत शिक्षक वृंद शिस्तबद्धतेने मार्गदर्शन करत होते.

बालदिंडीने शाळेपासून नेमतवाडीपर्यंत पायी प्रवास केला. तेथे पारंपरिक भजन, लेझीम आणि भक्तिगीतांच्या माध्यमातून वारकरी परंपरेचा साक्षात्कार घडवला. त्यानंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर रिंगण आखून भक्तिमय सोहळा पार पडला. विद्यार्थिनी व शिक्षिकांनी फुगड्यांच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमाची रंगत आणि उत्साह

शेवटी खाऊ वाटप करून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. हा संपूर्ण सोहळा एक अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक शिक्षणाचा समृद्ध अनुभव ठरला.

कार्यक्रमासाठी श्री तानाजी पवार, श्री मदनकुमार चव्हाण, श्री रामदास कौलगे, श्री रामचंद्र भोसले, श्रीम. स्नेहल देशपांडे, श्री सुग्रीव आमराळे, श्री श्रावण शिंदे, श्री दत्तात्रय जमदाडे, श्री नितीन भुसनर, श्री समाधान खारे, श्री कुलदीप गायकवाड, श्री अमृत वाघमारे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय टरले, श्री राहुल बागल, सौ.शितल पाटील, सौ. रुपाली इकारे, सौ. अंजली सांगोलकर, प्रा. श्री धनाजीराजे गायकवाड, प्रा. श्री बाळासाहेब पांढरे, प्रा. सौ प्रतिज्ञा माने, प्रा. सौ.रोहिणी गायकवाड, प्रा.सौ वंदना म्हेत्रे, प्रा. सौ. विद्या रोडगे, श्री योगेश गायकवाड, श्री नितीन गायकवाड,आदी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बाल दिंडी केवळ परंपरेचे जतन नव्हे, तर नव्या पिढीला मूल्यशिक्षण देणारे एक प्रेरणादायी पाऊल ठरले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या