Dr.Ambedkar Education डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण व किती पदव्या घेतल्या? बहिष्कृत हितकारणी सभा व सभेचे उद्दिष्टे, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण व किती पदव्या घेतल्या? बहिष्कृत हितकारणी सभा व सभेचे उद्दिष्टे, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना



"नवीन आयुष्य घडवण्याकरिता उंची गाठण्याची जर तुमची तयारी नसेल, आपल्यात नवजोम आणता येत नसेल, तर तुम्ही मेलेलेच बरे."

                 विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानाचे प्रतीक, विश्वभूषण, बोधिसत्व, संविधान निर्माता, नवनिर्माण युगंधर, मूकनायक, विश्वरत्न, बहिष्कृत हितकारक, बहुजनांचा उद्धारकर्ता, महान समाज सुधारक, तत्त्ववेत्ते, राष्ट्र निर्माता, महान इतिहासकार, महान अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत, महान लेखक, महामानव, बोधिसत्व, प्रज्ञावंत, शीलवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महार जातीमध्ये झाला. त्या काळामध्ये हिंदू समाज व्यवस्थेच्या उतरंडीतील सर्वात तळाची महार जात समजली जात होती. सर्व प्राणीमात्रावर प्रेम करण्याची शिकवण देणारा स्पृश समाज अस्पृश्यांना मात्र सावलीला देखील उभे राहू देत नव्हता. सार्वजनिक जागा, सार्वजनिक पानवटे, मंदिर, शाळा इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश बंदी होती. अनेक पिढ्यांपासून आलेल्या या अस्पृश्यता परंपरेमुळे निरक्षरता ही अस्पृश्य समाजामध्ये प्रचंड निर्माण झाली होती. निरक्षर असल्यामुळे त्यांना रस्ते झाडणे, मृत जनावरे उचलणे, जोडे शिवणे, शौचालयाची साफसफाई करणे अशा पद्धतीची हलकी कामे करावी लागत होती. अस्पृश्य समाज हा गावकुसाच्या बाहेर असायचा. अशा सामाजिक परिस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड जवळील अंबवडे हे त्यांच्या घराण्याचे मुळगाव आहे.

                    डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या चळवळीचे प्रमुख होते. सामाजिक जीवनात वेळोवेळी निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने व सखोल अभ्यास करून त्यावर ते बोलत असायचे. समाजात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ते अत्यंत तळमळने प्रयत्न करत असत.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण व पदव्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनेक पदव्या, अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. त्यांनी पूर्ण केलेल्या अभ्यासक्रम, पदव्या पुढीलप्रमाणे...

  1. Master of art MA
  2. Master of science MSc 
  3. Bachelor of law LLB 
  4. Bachelor of Arts
  5. Doctor of philosophy PHD 
  6. Doctor of science DSC 
  7. Barrister at law BL 
  8. Master of law LLM 
  9. Economics MA
  10. Doctor of literature D.lit
  11. MSc in economics 
  12. MA in sociology 
  13. MSc in sociology 
  14. MA In history 
  15. MA in philosophy 
  16. MA in politics 
  17. MA in anthropology 
  18. MA in psychology 
  19. MA in English literature 
  20. MA in German 
  21. MA in public administration 
  22. MA in economics 
  23. MA in mathematics 
  24. MA in linguistic 
  25. MA in comparative refegion 
  26. MA in Labour economics 
  27. MA in law and justice 
  28. MA in international law 
  29. Sociology in refegion 
  30. MA in international economics 
  31. MA refegion science


बहिष्कृत हितकारणी सभा 

अस्पृश्यांच्या सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 20 जुलै 1924 रोजी केली. बहिष्कृत हितकारणी सभेचे पहिले अध्यक्ष चिमणलाल हरिलाल सेटलवाड हे होते. कार्याध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते.


बहिष्कृत हितकारणी सभेची ध्येये 

  1. विद्यार्थी वस्तीगृहाद्वारे अगर अन्य साधनांच्या मदतीने  बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रसार करणे.
  2. बहिष्कृत समाजाकरता वाचनालय शैक्षणिक वर्ग उघडणे.
  3. बहिष्कृत समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्याकरता औद्योगिक व शेतीविषयक शाळा चालविणे.

अस्पृश्य समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी वसिगृहे काढण्याचे ठरविले. निरनिराळ्या ठिकाणी शाळा काढून या मुलांना शिक्षण देण्याची सोय त्यांनी केली. काही ठिकाणी वाचनालय काढून मुलांच्या मनात वाचनाचे आवड निर्माण केली. स्पष्ट हेतू एकच मुलांना पूर्वीपेक्षा अधिक ज्ञान मिळावे. अस्पृश्य समाजातच त्यांचा जन्म झाल्याने अस्पृश्यांच्या दुःखांचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव होता. आपल्या समाजाचा विकास स्वतःच करायचा मंत्र त्यांनी आपल्या बांधवांना दिला. अस्पृश्यांना सामाजिक, धार्मिक गुलामगिरीतून मुक्त केल्यास ते राजकीय स्वतंत्र्याचा लढा देखील प्राणपणाने मिळवतील असे आंबेडकरांना वाटत असायचे. ते ठिकठिकाणी जाऊन तरुणांना उद्देश करत असायचे. ते नेहमी म्हणायचे मी तुमच्या सर्वांच्या पुढे आहे माझ्या मागून तुमची पाऊले पडू द्या. 

सर्व व्यक्ती बरोबर अन्न, वस्त्र व निवारा मिळवण्याचा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. सन्मानानाचे जीवन लाभावे, असे जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तुम्ही स्वावलंबनाची कास धरा तोच तुमचा तारण कर्ता आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके 

▪️भारताचे संविधान

▪️माझी आत्मकथा

▪️ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म

▪️शूद्र पूर्वी कोण होते ?

▪️रुपयापुढील समस्या : उगम व उपाय

▪️पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी

▪️हिंदू कोड बिल

▪️पुणे करार

▪️भारतातील जाती

▪️हिंदुवादाचे कोडे

▪️बहिष्कृत भारत अग्रलेख मुकनायक

▪️अस्पृश्य मूळचे कोण ?

▪️क्रांती आणि प्रतिक्रांती

▪️जाती प्रथेचे निर्मूलन

▪️संविधान सभेतील भाषणे आणि चर्चा

▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाजलेली भाषणे

▪️राज्य आणि अल्पसंख्यांक

▪️बुद्ध आणि कार्ल मार्क्स

▪️अर्थात धर्मांतर का ?


स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 

1935 च्या कायद्याने प्रांतांना स्वायत्तता मिळाली. होणाऱ्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय आंबेडकरांनी घेतला. त्यासाठी स्वतंत्र पक्षाची आवश्यकता त्यांना निर्माण झाली. म्हणून त्यांनी ऑगस्ट 1936 मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात जबाबदार शासन पद्धतीचे तसेच मजूरांचे समर्थन केले. अशासकीय नियंत्रणाखाली उद्योगधंद्याची निर्मिती, कामगारांना मालकांच्या पिळवणुकीपासून संरक्षण, कामगारांना कामाच्या ठिकाणी सुविधा, खेड्यामध्ये सभागृहे, वाचनालय सुरू करणे इत्यादी बाबींचा समावेश जाहीरनाम्यात होता. त्यावेळी प्रांतिक विधिमंडळात 175 पैकी केवळ 15 जागा राखी होत्या. मजूर पक्षाने राखीव जागा सोबत खुल्या जागेवर देखील आपली उमेदवार उभे केले. 17 फेब्रुवारी 1937 रोजी झालेल्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्यांचे 17 पैकी 13 उमेदवार विजयी झाले.

             अशा या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानाचे प्रतीक, विश्वभूषण, बोधिसत्व, संविधान निर्माता, नवनिर्माण युगंधर, मूकनायक, विश्वरत्न, बहिष्कृत हितकारक, बहुजनांचा उद्धारकर्ता, महान समाज सुधारक, तत्त्ववेत्ते, राष्ट्र निर्माता, महान इतिहासकार, महान अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत, महान लेखक, महामानव, बोधिसत्व, प्रज्ञावंत, शीलवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या