Police पोलीस म्हणजे काय हे माहित आहे का ? पोलीस या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ जाणून घेऊयात
पोलीस हा शब्द शहर किंवा नगर राज्य, राज्यव्यवस्था तसेच राज्यघटना या अर्थाच्या ग्रीक शब्द polis यापासून तयार झालेला आहे. सर्वप्रथम तो फ्रेंच भाषेमध्ये रूढ झाला. पाच मध्ये राष्ट्रांमध्ये प्राचीन काळापासून नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करत होते. आजही पोलीस प्रशासनाचे काम हे कायदा व सुव्यवस्था राखणे हेच आहे.
भारतामध्ये पोलीस दलाची स्थापना 1858 नंतर ब्रिटिशांनी केली.यामागे अनेक कारणे आहेत. मुळात अधिकृतपणे पोलिस विभागाची स्थापना केली ती ब्रिटीशांनी. त्याआधी असली अंतर्गत सुरक्षेसाठी वेगळी 'संघटना' महाराष्ट्रात नव्हती. म्हणूनच यासाठी पोलीस हाच शब्द रुढ झाला असावा. पोलिस हा राज्य सरकारचा कर्मचारी असून राज्यात कायदा व सुव्यवस्था, गुन्ह्यांना आळा घालने, गुन्ह्यांचा शोध घेणे, आरोपींना शोधून काढणे, आरोपींना न्यायालयासमोर हजर करणे, लोकांच्या जीवनाचे संरक्षण करणे व सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे.
मराठीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्यास आरक्षक असे म्हणतात. म्हणजे पोलीस या शब्दास आरक्षक असा शब्द आहे. परंतु दुर्दैवाने आरक्षक हा शब्द इतका प्रचलित झालेला नाही.
0 टिप्पण्या