RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
बहुप्रतिक्षेत असलेली सन 2024 - 25 या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत 25 टक्के राखीव जागा वरील प्रवेश प्रक्रिये बाबत महत्वाच्या सूचना देण्यात येत आहेत.
आरटीई 25% प्रवेशासाठीची लिंक
सन 2024 - 25 या शैक्षणिक वर्षाकरिता पालकांना दिनांक 16 /4/ 2024 पासून प्रवेश लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. http://student.maharashtra.gov.in/adm_portal या लिंकवर पालकांना आरटीई 25% प्रवेशासाठी नोंदणी करता येईल.
या कारणांमुळे प्रवेश नाकारला जाईल
शाळा खालील कारणामुळे आरटीई 25% प्रवेश नाकारू शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोर्टलवर उपलब्ध करण्यात आलेली आहे.
अवैध निवासाचा पत्ता
अवैध जन्म तारखेचा दाखला
अवैध जातीचे प्रमाणपत्र
अवैध फोटो आयडी
अवैध दिव्यांग प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र अवैध असतील तर प्रवेश कोणत्याही पातळीवर रद्द करण्यात येईल.
आरटीई 25% प्रवेशासाठीच्या सर्वसाधारण सूचना
- ज्या पालकांनी यापूर्वी आरटीई 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
- प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा. अनेक अर्ज भरू नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेणार नाही. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी.
- भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकाकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा.
- भाडेकरार हा अर्ज भरण्याच्या दिनांकाचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरार दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच प्रवेश आरटीई 25% मधून झाला तरी ही संबंधित पालकांनी संपूर्ण फी भरावी लागेल.
- विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयंअर्थसहित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील. वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वयंअर्थसहित शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे. तथापि एखाद्या पालकांनी प्रथम प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची निवड करायची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्रथम प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा निवडता येईल.
- विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा किंवा शासकीय शाळा नसतील व स्वयंअर्थसहित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थसहित शाळेत मुलांना 25% अंतर्गत सोडत पद्धतीने प्रवेश दिला जाईल.
- अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयंअर्थसहित शाळा नसेल तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून तीन किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्याने होतील.
0 टिप्पण्या