Sanchy mannyata 2025 संच मान्यतेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची माहिती

संच मान्यतेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची माहिती



राज्यातील सर्व शाळांच्या संच मान्यतेबाबची अत्यंत महत्त्वाची माहिती...

राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा यांचे सन २०२४-२०२५ च्या संचमान्यता शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ व अनुषंगिक शासन निर्णयानुसार शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तरी सदर उपलब्ध झालेल्या संचमान्यता तातडीने तपासून शासन निर्णयानुसार पदे अनुज्ञेय झाले आहेत, याबाबत खात्री करावी. संच मान्यतेमध्ये त्रुटी असल्यास संचालनालयास दिनांक २५.०२.२०२५ पुर्वी माहिती कळवावी. त्यानंतर आलेल्या त्रुटी विचारात घेतल्या जाणार नाहीत. असे पत्र प्राथमिक संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकऱ्यांना काढले आहे.

              ज्या शाळेने दिनांक ३०.०९.२०२४ रोजी विद्यार्थी ऑनलाईन प्रणाली मध्ये नोंदविले नाहीत व ज्या शाळेमधील एकही विद्यार्थी आधार प्रमाणित केला नाही. अशा शाळांची यादी संचालनालयास उपलब्ध करुन देण्यात यावी. त्याच प्रमाणे सद्यस्थितीत ज्या शाळांचे विद्यार्थी संचमान्यतेकरीता केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून ऑनलाईन फॉरवर्ड केले आहेत व ज्या शाळांनी वर्किंग पोस्ट भरली आहे. अशा शाळांच्या संचमान्यता झाल्या आहेत. तरी उर्वरित शाळांच्या ऑनलाईन विद्यार्थी फॉरवर्ड करावे व कार्यरत पदांची माहिती शाळास्तरावरुन अंतिम करावी. अशा पद्धतीचे आदेश काढण्यात आलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या