SQAAF - School Quality Assessment and Assurance Framework शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा( SQAAF - School Quality Assessment and Assurance Framework )शाळेचे खाते कसे तयार करायचे ? किती मानके भरावीत? SQAAF म्हणजे शाळेतील सर्व शिक्षकांचे टीम वर्क मानकांच्या डॉक्युमेंट्स pdf कशी तयार करावी? गुगल ड्राईव्ह ला SQAAF चे फोल्डर बनवणे व pdf फाईल अपलोड करणे अपलोड केलेल्या प्रत्येक मानकांच्या उप फोल्डरच्या pdf फाईलला "anyone with the लिंक" हा access देणे प्रत्येक मानाकाच्या फाईल ची गुगल ड्राईव्ह लिंक बनवणे SQAAF च्या साईट वर त्या त्या मानकांचा विंडो ओपन करून त्या त्या मानकाच्या गुगल ड्राईव्हची लिंक भरणे व माहिती सबमिट करणे

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा( SQAAF - School Quality Assessment and Assurance Framework )






सध्या आपल्याला SQAAF च्या वेबसाईटवर संबंधित मानकांचे फोटो अपलोड करायचे काम करायचे आहे. हे काम कसे करावे याविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न आहे.

शाळेचे खाते कसे तयार करायचे ?

1) scert-data.web.app या लिंकवर क्लिक करा.

2) आता तुमच्यासमोर SQAAF चा इंटरफेस येईल, यामध्ये आपणास पुढील गोष्टी करावयाच्या आहेत...

      अ) खाते तयार करा.

      ब) लॉगिन

      क) पासवर्ड बदला 

असे तीन विंडोज दिसतील. यामधील खाते तयार करा या विंडोजला क्लिक करावे.

3) खाते तयार करा या विंडोजला क्लिक करा. यामध्ये तुम्हाला पुढील विंडोज दिसतील...

              अ) येथे ईमेल प्रविष्ठ करा - यात शाळेचा किंवा                        मुख्याध्यापकांचा ईमेल टाईप करावा.

           ब) या संकेतस्थळासाठीचा पासवर्ड  लिहा- यात तुमचा पासवर्ड तयार करा.

(पासवर्ड तयार करताना पासवर्ड कमीत कमी 8 अक्षरी असावा. 1 कॅपिटल, 1 स्मॉल, 1 स्पेशल कॅरेक्टर,1 अंक सर्व मिळून 8 अक्षरी बनवावा.)

               क) बनवलेल्या पासवर्ड ची पुष्टी/खात्री करावी. यामध्ये              तुम्ही जो पासवर्ड तयार केला आहे तोच पुन्हा प्रविष्ठ करावा.


4) आता खाते तयार करा या विंडोजला क्लिक करा.

5) आता तुम्ही जो ईमेल एंटर केला होता, त्या gmail वर जा. तुम्हाला SQAAF कडून शाळा व्हेरिफाय करण्यासाठी एक मेल येईल. त्यावर क्लिक करा. तुमची शाळा व्हेरिफाय करा.

6) आता पुन्हा scert-data.web.app या लिंकला क्लिक करा.

7) आता तुमच्या स्क्रीन वर जो इंटरफेस येईल त्यातील लॉगिन या विंडोजला क्लिक करा.

8)आता तुम्हाला 2 विंडो दिसतील.

          अ) येथे ईमेल प्रविष्ठ करा - आता जो ईमेल तुम्ही अगोदर                  प्रविष्ठ केला होता तोच ईमेल या विंडो मध्ये टाईप करा.

          ब) या संकेतस्थळासाठीचा पासवर्ड लिहा - यात तुम्ही जो                  पासवर्ड तयार केला आहे तो टाईप करा.

          क) लॉगिन - आता लॉगिन वर क्लिक करा.

9) आता तुम्ही तुमच्या शाळेच्या SQAAF च्या साईटवर आला आहात.

10) तुम्हाला एकूण 128 मानके दिसत आहेत. त्यापैकी  काही मानके तुमच्या शाळेला लागू नाहीत. शिवाय प्रत्येक मानकाला क्लिक केल्यावर मुख्य मानकामध्ये आणखी काही उपमानके आहेत.


 किती मानके भरावीत? 

सर्वप्रथम आपल्या शाळेला किती मानके भरायची आहेत व किती लागू नाहीत हे पहावे. लागू नसलेली मानके भरायची नाहीत.


 SQAAF म्हणजे शाळेतील सर्व शिक्षकांचे टीम वर्क 

SQAAF हे शाळेतील सर्व शिक्षकांनी एकत्रित करायचे टीम वर्क आहे. त्यामुळे लागू नसलेली मानके वगळून जेवढी मानके येतात त्यांना आपल्या शाळेतील एकूण शिक्षक संख्येने भाग द्या व जे उत्तर येईल तेवढी मानके प्रत्येक शिक्षकांनी भरावीत. त्यामुळे काम सोपे व एकदम लवकर होईल.

उदा. 128 मानकांपैकी 14 मानके तुम्हाला भरायची नाहीत, म्हणजे 128-14=114 मानके भरायची आहेत. तुमच्या शाळेत 20 शिक्षक आहेत असे गृहीत धरू. म्हणजे 114÷20=5.7 म्हणजे 14 शिक्षकांना 6 मानके भरायची आहेत. उरलेल्या 6 शिक्षकांना 5 मानके भरायची आहेत.

मानकांच्या डॉक्युमेंट्स pdf कशी तयार करावी?

1) दिलेल्या 128 मानकांना क्लिक केल्यावर तुम्हाला त्यात पुन्हा 3 ते 6 उपमानके दिसतील.

2) त्या त्या उपमानकात जे वर्णन दिले आहे, त्या वर्णनाशी संबंधित फोटो/डॉक्युमेंट यांची pdf कॉपी तयार करावी.

उदाहरणार्थ 1) तुम्ही मानक क्रमांक 1 या विंडोला ओपन केले, त्यात तुम्हाला 4 उपमानके दिसत आहेत. त्यात उपमानक क्र - 1 शी संबंधित जे काही डॉक्युमेंट असतील ते तयार करावेत.

2) उपमानक क्र - 2 शी संबंधित जे काही डॉक्युमेंट असतील ते तयार करावेत.

3) उपमानक क्र - 3 शी संबंधित जे डॉक्युमेंट असतील ते तयार करावेत.

या प्रमाणे ज्या ज्या उपमानकांचे जे जे डॉक्युमेंट तयार होऊ शकतात त्या प्रत्येक उपमानकांचे डॉक्युमेंट तयार करून घ्यावेत.

3) प्रत्येक उपमानकाच्या डॉक्युमेंट्स ची एकच pdf फाईल बनवावी.


 गुगल ड्राईव्ह ला SQAAF चे फोल्डर बनवणे व pdf फाईल अपलोड करणे

1) ज्या ज्या शिक्षकांकडे जेवढी मानके बनवण्याचे निर्धारित झाले आहे त्या त्या शिक्षकांनी आपापल्या गुगल ड्राईव्ह वर SQAAF नावाचे एक मुख्य फोल्डर बनवावे.

2) त्या मुख्य फोल्डरच्या आत तुम्हाला ज्या ज्या क्रमांकाच्या मानकाचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्या प्रत्येक मानकाच्या क्रमांकाचे पुन्हा एक मुख्य फोल्डर बनवून घ्यावे.

3) प्रत्येक मानकाच्या फोल्डरच्या आत असलेल्या प्रत्येक उप मानाकाची वेगवेगळी माहिती देणाऱ्या डॉक्युमेंट्सची एक वेगळी वेगवेगळी pdf फाईल बनवायची आहे.

उदाहरणार्थ. 

मानक क्रमांक 1 मध्ये 4 उपमानके आहेत, तर प्रत्येक उपमानकांची माहिती देणारे फोटो व इतर घटकांची एकत्रित pdf फाईल बनवावी.

उदाहरणार्थ 

मानक क्र -1 मध्ये 4 उप मानके आहेत तर....

अ) मानक क्र - 1 हा मुख्य फोल्डर तयार होईल.

ब) या मानक क्र - 1 च्या फोल्डरच्या आत चारही उपमानकांची माहिती देणाऱ्या pdf फाईल असतील.

क) त्या प्रत्येक pdf फाईलला...

मानक 1-1

मानक 1-2

मानक 1-3

मानक 1-4 

अशी नावे द्यावीत व त्या त्या  फाईल ची लिंक त्या त्या उप मानकाला क्लिक करून लिंक कॉपी करावी व मगच SQAAF च्या प्रत्येक उपमानाकाला क्लिक करून त्या त्या उपमानकाच्या संबंधित ड्राईव्हच्या विंडो मध्ये पेस्ट करायची आहे. तसेच सबमिट बटण क्लिक करायचे आहे.


अपलोड केलेल्या प्रत्येक मानकांच्या उप फोल्डरच्या pdf फाईलला "anyone with the लिंक" हा access देणे 

1) तुम्ही प्रत्येक मानकांची जी pdf फाईल तुमच्या SQAAF फोल्डर मध्ये अपलोड केली आहे, त्या PDF फाईलच्या उजव्या बाजूला जे तीन बिंदू आहेत त्याला क्लिक करावे.

2) त्यात 2 नंबरचा पर्याय manage access ला क्लिक करावे.

3) आता तुम्हाला 2 नंबरचे  Restricted हे असा विंडो दिसेल त्यावर क्लिक करावे.

4) पुन्हा Restricted असा विंडो दिसेल. त्यावर क्लिक करावे.

5) आता Anyone With the link यावर क्लिक करावे व अपडेट झाल्यावर ड्राईव्ह च्या बाहेर यावे.


प्रत्येक मानाकाच्या फाईल ची गुगल ड्राईव्ह लिंक बनवणे 

SQAAF या मुख्य फोल्डरच्या आत तुम्ही प्रत्येक मानकांच्या ज्या pdf फाईल अपलोड केल्या आहेत त्या प्रत्येक pdf फाईलची लिंक बनवायची आहे.

1) pdf फाईलच्या उजव्या बाजूला जे 3 बिंदू दिले आहेत त्याला क्लिक करा.

2) आता तुम्हाला 4 थ्या क्रमांकावर copy link चा पर्याय दिसेल. त्यावर फक्त क्लिक करा. त्या मानकाच्या pdf फाईल ची लिंक आपोआपच कॉपी होईल.

3) आता ती लिंक त्या त्या मानकाचा नंबर देवून तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअप अकाऊंट वर कॉपी करून पेस्ट करा

4) अशा रीतीने प्रत्येक शिक्षकाने त्यांना जेवढ्या मानकांचे काम करायचे आहे तेवढ्या मानकांच्या लिंक तयार करून घ्याव्यात.


SQAAF च्या साईट वर त्या त्या मानकांचा विंडो ओपन करून त्या त्या मानकाच्या गुगल ड्राईव्हची लिंक भरणे व माहिती सबमिट करणे

1) SQAAF ची साईट ओपन करावी.

2) तुम्हाला ज्या मानकाची गुगल ड्राईव्हची लिंक भरायची आहे ते मानक ओपन करावे.

3) आता त्या मुख्य मानकातील प्रत्येक उपमानकाची गुगल ड्राईव्ह ची लिंक जी तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप वर पेस्ट करून ठेवली आहे ती पुन्हा कॉपी करावी. जर अगोदरच तुम्हाला कोणत्या उप मानकाची लिंक भरायची आहे हे तुमचे निश्चित झाले असेल तर अगोदरच त्या मुख्य मानकाच्या उपमानकाची लिंक कॉपी करून SQAAF ड्राईव्ह ओपन करावे.

4) आता जे मानक तुम्ही ओपन केले आहे त्यातील ज्या उप मांनाकाची लिंक तुम्हाला भरायची आहे त्या उप मानाकावर क्लिक करावे. ताबडतोब ते उपमानक आकाशी रंगाचे होईल.

5) आता सर्वात खाली  "पुरावे" या विंडो वर यावे.

6) "उपरोक्त विषयांचे समर्थन करणारी....." असे वाक्य ज्या विंडो मध्ये लिहिले आहे त्या विंडो वर क्षणभर बोट दाबून धरावे.

तुम्हाला paste असा शब्द दिसला की त्यावर क्लिक करा व तुम्ही उपमानकाची जी लिंक कॉपी केली होती ती पेस्ट करा.

7) ताबडतोब तुम्हाला सबमिट हे बटण हाय लाईट झालेले दिसेल. त्यावर क्लिक करा व माहिती सबमिट करावी.

8) अशा रीतीने सर्व मुख्य मानकांच्या उपमानकांची लिंक भरावी व सबमिट करावी व SQAAF चे काम पूर्ण करावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या