राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 मसुद्यावर प्रतिक्रिया नोंदवण्याबाबत

इयत्ता 3 री ते 12 वी इयत्तांचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शक अभिप्राय सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ञ व शैक्षणिक प्रशासन यांच्यामार्फत मागवण्यात येत आहेत, अभिप्राय कोणी द्यावा ? व कधीपर्यंत द्यावा ?, अभिप्राय नोंदवतानाचा द्यावयाचा तपशील, अभिप्राय पोस्टाने पाठवायचे असल्यास, अभिप्राय नोंदविण्यासाठी LINK 


               नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता 3 री ते 12 वी इयत्तांचा पाठ्यक्रम तयार करणेसाठी मार्गदर्शक, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024  मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुर्ण मार्फत तयार करण्यात आला आहे. सदर मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर दिनांक. 23/05/2024 पासून जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आला आहे.

अभिप्राय कोणी द्यावा ? व कधीपर्यंत द्यावा ?

राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) 2024 मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय दिनांक 03/06/2024 पर्यंत खालील लिंक वर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत असे आवाहन करण्यात येत आहे.

अभिप्राय नोंदवतानाचा द्यावयाचा तपशील 

अभिप्राय नोंदवत असतांना त्यामध्ये आपले नाव, मोबाइल नं. इमेल, पत्ता, कार्यालय, जिल्हा इत्यादी तपशील देण्यात यावा. तसेच अभिप्राय व सूचना सप्रमाण व सकारण नोंदविल्या जाव्यात त्यामध्ये क्षेत्र, विषय, स्तर, पृष्ठ क्रमांक, मूळ मसूद्यातील तपशील, आवश्यक बदल, बदलाचे कारण, कोणत्या मुद्यामध्ये दुरुस्ती आवश्यक वाटते याचा तपशील, सुधारित मजकूर कसा असावा, यांचा समावेश असावा.


अभिप्राय पोस्टाने पाठवायचे असल्यास

पोस्टाने अभिप्राय पाठवणार असल्यास त्यावर SCF-SE राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 बाबत अभिप्राय (अभ्यासक्रम विकसन विभागासाठी) असे ठळक अक्षरात लिहून, वरील पत्यावर पाठवावेत. अभिप्राय नोंदवण्याचा कालावधी दिनांक 23/05/2024 ते 0306/2024


अभिप्राय नोंदविण्यासाठी LINK https://forms.gle/TDHL9z8harzRgJoy5

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या