Aashadhi Vaari आषाढी वारी ज्ञानेश्वर माऊली पालखी वेळापत्रक 2024, वारीचा इतिहास, रिंगण, अश्व व बैल जोडी माहिती

 

आषाढी वारी ज्ञानेश्वर माऊली पालखी वेळापत्रक 2024, वारीचा इतिहास, रिंगण, अश्व व बैल जोडी माहिती



श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवार 29 जून 2024 रोजी वार शनिवार संध्याकाळी चार वाजता आषाढी वारीसाठी आळंदी मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असून पहिला मुक्काम ज्ञानेश्वर माऊलीचे आजोळ असलेल्या गांधी वाड्यातील दर्शनबारी मंडपात होणार आहे. 30 जून वार रविवार रोजी पालखी आळंदीतून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.

              ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान वेळापत्रक

  • 30/06/2024 आळंदी पासून प्रवास ते पुणे पर्यंत प्रवास एकूण 29 कि.मी प्रवास 
  • 01/07/2024 पुणे मुक्काम
  • 02/07/2024 पुणे पासून प्रवास ते सासवड पर्यंत प्रवास एकूण 32 कि.मी. प्रवास
  • 03/07/2024 सासवड मुक्काम
  • 04/07/2024 सासवड पासून प्रवास ते जेजुरी पर्यंत प्रवास एकूण 16 कि.मी प्रवास
  • 05/07/2024 जेजुरी पासून प्रवास ते वाल्हे पर्यंत प्रवास एकूण 12 कि.मी प्रवास
  • 06/07/2024 वाल्हे पासून प्रवास ते लोणंद पर्यंत प्रवास एकूण 20 कि.मी प्रवास
  • 07/07/2024 लोणंद मुक्काम
  • 08/07/2024 लोणंद पासून प्रवास ते तरडगाव पर्यंत प्रवास एकूण 08 कि.मी प्रवास
  • 09/07/2024 तरडगाव पासून प्रवास ते फलटण पर्यंत प्रवास एकूण 21 कि.मी. प्रवास
  • 10/07/2024 फलटण पासून प्रवास ते बरड पर्यंत प्रवास एकूण 18 कि.मी प्रवास
  • 11/07/2024 बरड पासून प्रवास ते नातेपुते पर्यंत प्रवास एकूण 21 कि.मी प्रवास
  • 12/07/2024 नातेपुते पासून प्रवास ते माळशिरस पर्यंत प्रवास एकूण 18 कि.मी प्रवास
  • 13/07/2024 माळशिरस पासून प्रवास ते वेळापुर पर्यंत प्रवास एकूण 19 कि.मी प्रवास
  • 14/07/2024 वेळापुर पासून प्रवास ते भंडीशेगाव पर्यंत प्रवास एकूण 21 कि.मी प्रवास
  • 15/07/2024 भंडी शेगाव पासून प्रवास ते वाखरी पर्यंत प्रवास एकूण 10 कि.मी प्रवास
  • 16/07/2024 वाखरीपासून प्रवास ते पंढरपुर पर्यंत प्रवास एकूण 5 कि.मी प्रवास
  • 17/07/2024 : देवषयनी आषाढी एकादशी

                               

इतिहास

ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे पायी वारी करत होते. श्री हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी- समारंभांसहीत थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली होती. ती प्रथा आजही दिमाखदार पद्धतीने चालवली जाते. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे इत्यादी लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून मिळत असायचे. या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत होती. सरकारने 1852 मध्ये पंच कमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.


रिंगण

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सोहळ्यातले एक महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण. हा कार्यक्रम पालखीत सहभागी वारकऱ्यांबरोबरच स्थानिक लोकांचा व माध्यमांच्या आकर्षणाचा विषय असतो. रिंगण म्हणजे एक प्रकारचा खेळ म्हणता येईल. रिंगण चा शब्दशः अर्थ म्हणजे वर्तुळ. रिंगण म्हणजे म्हणजे पालखी भोवती गोल फिरणे. रिंगणचे ठिकाण म्हणजे मोठे मैदान. प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणे ठरलेली आहेत. रिंगणासाठी पालखी सोहळ्यातील भाविकांच्या संख्येनुसार मोकळी जागा लागते. काही सोहळ्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येनुसार रिंगणाची जागा बदलण्यात आली आहे. पालखी सोहळा वाटचाल करत रिंगणाच्या ठिकाणी पोचतो तेव्हा आधी चोपदार रिंगण लावतात. यामध्ये मध्यभागी पालखी, पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी व दिंड्या, त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्याभोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे रहातात. रिंगण लावणे हे कौशल्याचे काम आहे. चोपदारांचे कौशल्य व वारकऱ्यांची शिस्त याठिकाणी दिसून येते. रिंगण हे दोन प्रकारचे असते.


अश्व व बैल जोडी 

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा रथ ओढण्यासाठी दरवर्षी नवी बैलजोडी त्यांना अर्पण केली जाते. यासाठी वेगवेगळया कुटुंबातील बैल जोडीचे परीक्षण करून चांगले बैल निवडले जातात. या जोडीने ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः त्यांच्या आश्र्वावर आरूढ होऊन रिंगण करतात अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे. यासाठी रथाच्या पुढे माऊलींचा अश्व म्हणजे घोडा असतो. या अश्वाला विशेष आदराचे स्थान वारीमध्ये दिले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या