मेंदूसाठी आहार
आपला मेंदू सशक्त ठेवण्यासाठी आहारावरती नियंत्रण असणे आवश्यक आहे. योग्य आहार घेतल्याने मेंदू व शरीर सशक्त बनते. यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे.
- मासे हे मेंदूसाठी सर्वोत्तम खाद्य आहे. मासे खाल्ल्याने मेंदू तल्लक होतो व स्मरणशक्ती वाढते. भरपूर मासे असलेल्या देशात डॉक्टर कमी असतात अशी एक डच म्हण आहे.
- भूक असते तेव्हाच खावे.
- प्रक्रिया केलेले खाद्य वस्तू खाऊ नयेत.
- वनस्पती तूप खाऊ नये.
- कमी उष्मांक असलेले अन्नपदार्थ खावेत.
- बदाम आणि अक्रोड मेंदूसाठी सर्वोत्तम आहार आहेत.
- साखर तसेच मिठाचे सेवन गरजेनुसारच करावे.
- कमी फॅट असलेल्या अन्नाचे सेवन करावे. जास्त फॅट असलेले अन्नामुळे रक्त प्रवाह म्हणतो व मनुष्य जड होतो.
- आपल्या खाण्यात फळे आणि पालेभाज्या जास्त असाव्यात.
- मेंदूसाठी ग्लुकोज चांगले असते.
- रक्तातील साखरेचे प्रमाण खूप कमी झाले म्हणजे मेंदूची कार्यक्षमता कमी झालेली असते.
- उपवास करणे म्हणजे मेंदूलाही उपाशी ठेवणे होय.
- दही हे मेंदूसाठी सर्वोत्तम असे खाद्य पदार्थ आहे.
- मांसाआहारही योग्य प्रमाणातच करावा.
- सर्व प्रकारचे द्विदल धान्य, वाटाणे व चवळी इत्यादीचे सेवन करावे.
0 टिप्पण्या