स्वराज्य रक्षक छत्रपती शंभुराजे यांच्या ३६७ व्या जयंती निमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अभिवादन...
आज धर्मरक्षक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांची ३६७ वी.जयंती त्या निमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे व उत्सव अध्यक्ष सुभाष पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय ,छत्रपती संभाजी महाराज की जय ,जिजाऊ माता की जय च्या घोषणांनी छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला होता.
याप्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे ,ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे, ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे, राजन जाधव, गोवर्धन गुंड, अमोल शिंदे, रवी मोहिते, प्रताप चव्हाण, नाना भोईटे, माऊली पवार, प्रकाश ननवरे, अंबादास शेळके, उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, शिवाजी वाघमोडे, अनंत जाधव, उज्वल दीक्षित,वैभव गंगणे, विवेक फुटाणे, प्रकाश डांगे, सचिन गुंड, विजय पुकाळे, जीवन यादव, प्रा.संजय जाधव, ब्रह्मदेव पवार, सदाशिव पवार, मतीन बागवान, हरिभाऊ सावंत, बजरंग जाधव, राजाभाऊ आलुरे, प्रीतम परदेशी, जितू वाडेकर, अंबादास सपकाळ, रमेश अण्णा जाधव, गोवर्धन गुंड, राजेंद्र भोसले, मोहन कमीतकर, कुमार क्षीरसागर, राम माने, राजू व्यवहारे, प्रकाश डोंगरे, सचिन चव्हाण, श्याम सुरवसे, राहुल जाधव, गोटू पवार, विजय पोखरकर, देविदास घुले, सचिन स्वामी, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह तमाम शंभूप्रेमी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 टिप्पण्या