Holidays timetable 2024 25 नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुट्ट्या
आगामी शैक्षणिक वर्ष 2024 2025 मधील सुट्यांचे वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यानुसार 2 मे पासून शाळांना उन्हाळी सुटी असून 15 जूनला नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात होईल. सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकांना पुढील 2024 2025 या शैक्षणिक वर्षात तब्बल १२८ दिवस हक्काच्या सुट्या मिळणार आहेत. याशिवाय किरकोळ रजा, आजारी रजा, विशेष रजा वेगळ्या असणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जारी केला आहे. ही सगळी सुट्टी वजा विचारात घेता कामाची बाकी किती उरते हे पाहावे लागेल. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. कादर शेख व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी श्री. सचिन जगताप यांनी नवीन शैक्षणिक वर्षातील सुट्यांचे वेळापत्रक तयार केले. त्यास सीईओ मनीषा आव्हाले यांनी मंजुरी दिली. यात दिवाळीच्या सुट्या २८ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान असतील. १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीमुळे सुटी असेल. त्यानंतर १६ नोव्हेंबरपासून दिवाळीनंतर शाळा सुरू होणार असल्याचेही वेळापत्रकात स्पष्ट केले आहे. शिवाय शासनाने निर्धारित केलेल्या २० सुट्या, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील ३ आणि मुख्याध्यापक स्तरावरील २ सुट्ट्या असतील. ज्या शाळांना गणेशोत्सव, नाताळ, रमजान, मोहरम सारख्या सणांना सुट्या घ्यायच्या असतील, त्यांनीदिवाळीची सुट्टी कमी करून त्याऐवजी इतर सणांच्या तेवढ्याच कालावधीची सुट्टी समायोजनाने शालेय व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने जाहीर करावी. नागपंचमी, पोळा, राजमाता जिजाऊ जयंती आदी प्रसंगी स्थानिक मागणीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने मुख्याध्यापक अधिकारातील सुट्ट्या जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा, असेही आदेशात नमूद आहे. शहरासह जिल्ह्यातील सीबीएसईच्या शाळांनाही हेच वेळापत्रक लागू असणार असल्याचे शिक्षणाधिकारी श्री सचिन जगताप यांनी कळवले आहे. नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षकांना तब्बल ७६ सुट्या मिळणार आहेत. त्यात २० सार्वजनिक सुट्या, १० दिवस दिवाळी सुट्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील ३ सुट्या, ४० दिवसांच्या उन्हाळी सुट्या व मुख्याध्यापकांच्या अधिकारातील ३ सुट्यांचा समावेश आहे. या शिवाय या सत्रात रविवारच्या ५२ सुट्या मिळणार आहेत. अशा एकंदर १२८ दिवस सुट्या मिळणार आहेत.
0 टिप्पण्या