श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनास या तारखेपासून सुरुवात
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धनाचे काम खूप जोमाने चालू आहे. वारकऱ्यांचे श्रद्धास्थान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामानिमित्त 15 मार्च 2024 पासून सुमारे दीड महिने बंद होते. 5 जून पर्यंत काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशी काढण्यात आली आहे आशी माहिती देण्यात आलेली आहे. फक्त रोज सकाळी 5 ते दुपारी 11 वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध होते. श्री विठ्ठल दर्शनासाठी भाविकांना 30 फुटावरून मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. श्री विठ्ठलाच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेची उभारणी करण्यात येणार आहे. मंदिरच्या कामासाठी साधारण 45 दिवसाचा वेळ लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. ते अजूनही सतरा अठरा महिने चालू राहील. चैत्र वारीतील भाविकांना 30 फुटांवरून मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याची वेळ सकाळी 5 ते दुपारी 11 वाजेपर्यंत उपलब्ध होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाचे काम पूर्ण होत आले असून 2 जून 2014 पासून पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे.
मंदिराच्या गर्भगृहाचे व चार खांबाचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच पूर्ण होईल. 30 जून रोजी सभामंडपाचे काम पूर्ण होणार आहे. सभामंडपाचे काम पूर्ण होईपर्यंत दर्शन रांगेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. गरुड खांबाला चांदी आषाढी वारीच्या अगोदर बसवण्यात येणार आहे. चार खांब व सोळखांब यांचे काम अद्यावत चालू आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील छोटी मोठी असणारी सर्व कामे प्रगतीपथावर असून आषाढी वारीच्या अगोदर ती सर्व कामे पूर्ण होतील.
2 जून 2024 ते 9 जून 2024 या कालावधीमध्ये मृग नक्षत्रामध्ये करण्यात येणारी ओटी पूजा करण्यात येईल. पाद्य पूजा, ओटी पूजा, तुळशी पूजा करण्यात येतील. या सर्व पूजा पूर्ववत चालू राहणार आहेत. 7 जुलै रोजी देवाचा पलंग काढण्यात येणार असून श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे दर्शन पूर्ववत चालू राहणार आहे. अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
0 टिप्पण्या