Punyshlok Ahilyadevi Holkar धर्मरक्षिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

धर्मरक्षिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर



                     इंदौचे कर्तबगार, पराक्रमी व कार्यकुशल संस्थानिक मल्हारराव होळकर. त्यांचा मुलगा खंडेराव होळकर यांच्याबरोबर अहिल्यादेवी 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह 1733 ला झाला. विवाह झाल्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपल्या स्वभावाने घरातील सर्वांची मने जिंकून घेतली. राज्यकारभार त्यांनी जवळून पाहिला. पुरुषप्रधान संस्कृती असताना सुद्धा त्यांनी युद्ध कौशल्ये घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालवणे, युद्धाची रणनीती आखणे, लढाया करणे, पत्र व्यवहार करणे व न्याय निवाडा करणे इत्यादी सर्व गोष्टी शिकून घेतल्या.

अहिल्यादेवी होळकर यांचा जीवन परिचय

1725 मधील 31 मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळम तालुक्यातील चोराखळी आताची सोनाखळी हे गाव सोलापूर औरंगाबाद मार्गावरील येडशी जवळ महामार्गापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. या गावचे वतनदार बाळाजी मैदाड पाटील यांच्या पोटी अमृत हा मुलगा आणि सुशीला ही मुलगी आली. सुशीलाचा विवाह सध्याच्या चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर गावचे वतनदार माणकोजी शिंदे यांच्याशी झाला. चौंडी हे गाव सीना नदी आणि हरणा नदी यांच्या संगमावरती वसलेले आहे. या संमावर घाट आहेत. माणकोजी शिंदे या गावचा कारभार पाहत होते. त्यांना पेशव्यांचे बोलावणे आले तर त्यांना पेशव्यांकडे जावे लागत असायचे. माणकोजी शिंदे ना वेगवेगळ्या युद्ध कला अवगत होत्या. प्रत्येक प्रकारची युद्ध सामग्री त्यांच्याकडे होती. माणकोजी शिंदेच्या घरात सर्व सुख, सुविधा व अन्नधान्यांचे रेलचेल होती. माणकोजी शिंदे हे त्याकाळचे गावचे चौगुला पाटील होते. चौंडी जवळील याच  परागण्यात पाथर्डी येथे ही त्यांची पाटीलकी व शेतीवाडी होती. पुण्यश्लोक अहिल्या यांचा जन्म तत्कालीन अहमदनगर परागण्यातील चौंडी गावी ज्येष्ठ वद्य सप्तमी शक्य 1725 मध्ये रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव सुशिलाबाई व वडिलांचे नाव माणकोजी पाटील शिंदे होते. पुण्यश्लोक अहिल्या यांना माणकोजी शिंदे पाटील व शहाजी माणकोजी शिंदे पाटील असे दोन भाऊ होते. मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव होळकर यांच्याबरोबर अहिल्यादेवी 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह 1733 ला झाला. विवाह झाल्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केले.

पती खंडेराय होळकर यांचे निधन 

कुंभेरीच्या लढाईमध्ये 1754 मध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे पती खंडेराया होळकर यांना वीरमरण आले. अहिल्यादेवी यांना वयाच्या 29 व्या वर्षी वैधव्य प्राप्त झाले. त्याकाळी पतीच्या निधनानंतर पत्नीने सती जाण्याची प्रथा होती. आपण जर सती गेलो तर आपल्या रयतेचे काय होईल. या विचाराने परकीय सत्तांचे आक्रमण त्यांनी परतवून लावले व आपली रयत सुखी व समाधानी ठेवली. धर्म, रुढी, चालीरीती व परंपरा यांना झुगारून रयतेचे कल्याणकारी राज्य निर्माण केले.

              दुःखामध्ये डोळ्यातून अश्रूची धार आणू नका, 

              संकुचित जगण्याला सार मानू नका, 

              जीवनाला कधी भार मानू नका, 

              अहिल्यादेवीची शपथ कधीही हार मानू नका.

              मूर्खाच्या संगतीत राहाल,

              तर तुम्ही मातीमोल व्हाल.

              अहिल्यादेवीच्या विचारांनी जर जगालात,

              तर पुण्यश्लोक व्हाल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा राज्यकारभार 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 28 वर्ष राज्यकारभार पाहिला. त्यांनी आपल्या राज्यामध्ये विविध ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. त्यांनी हिमालयातील बद्रीनाथ क्षेत्र, हरिद्वार, रामेश्वर, मथुरा, अमरकंटक व सप्तशृंगी इत्यादी ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. त्यांची दैवावर व धर्मावर खूप श्रद्धा होती. गोरगरिबांना त्या नेहमी मदत करत असत. त्यांनी जेजुरीचे मंदिर व तलाव यांचा जिर्णोद्धार केला. समान नागरी कायद्याची मागणी आज आपण करत आहोत पण फार वर्षा पूर्वी अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार करत असताना सर्वांना समान कायदा समान वागणूक दिली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कर्तुत्वाने भारतीय इतिहासामध्ये अढळ असे स्थान निर्माण केलेले आहे.

                    होळकरांची सून होती बहुगुणी, 

                    शिक्षणाची ओढ होती लहानपणी, 

                    गरज ओळखून सुखवले सर्वजणी,

                   अशी जहाली एक दुरर्दृष्टी एक मर्दानी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या