पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत...
शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा विद्याथ्यांचे आई/वडील/पालक यांच्या संयुक्त बैंक खात्यात (विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बैंक खात्याशी संलग्न करुनच देय रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यात) जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत विद्यार्थी किंवा विद्याथ्यांचे आई वडील/पालक यांच्या बैंक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी" याप्रमाणे दुरुस्ती करण्यात आलेली आहे. सदरचे शुद्धीपत्रक पुढील कार्यवाहीसाठी सोबत जोडून पाठविण्यात येत आहे. तरी इयत्ता ५ वी व ८ वी मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे बैंक डिटेल्स भरताना सदर शुध्दीपत्रान्वये कार्यवाही करण्यात यावी.
0 टिप्पण्या