SSC Exam above 90% SC candidate get 2 Lakh भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना इयत्ता दहावी मध्ये अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गुण असतील तर त्यांना दोन लाख रुपये मिळणार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना 

इयत्ता दहावी मध्ये अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गुण असतील तर त्यांना दोन लाख रुपये मिळणार


                       महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवत असते. त्यापैकी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना मार्च 2021 पासून चालू करण्यात आलेली आहे.

                          या योजनेमध्ये इयत्ता दहावी मध्ये अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गुण मिळालेले असतील तर त्यांना दोन वर्षासाठी दोन लाख रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यांना पुढील शिक्षणासाठी अकरावी व बारावी या दोन वर्षासाठी प्रत्येकी एक एक लाख रुपये एकूण दोन लाख रुपये मिळणार आहेत.

                         NEET, MH-CET, JEE, MEDICAL इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश तयारीसाठी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे पालक हे आर्थिक दुर्बल घटकातील असावेत. त्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे.

आवश्यक कागदपत्रे 

  1. विहित नमुन्यात अर्ज 
  2. इयत्ता दहावीचे गुणपत्रकाची साक्षांकित प्रत 
  3. इयत्ता दहावी बोर्ड प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत 
  4. इयत्ता दहावी शाळा सोडल्याचा दाखला साक्षांकित प्रत 
  5. चालू आर्थिक वर्षातील तहसीलदार तथा सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पालकांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची मूळ प्रत
  6. सक्षम प्राधिकरणाने दिलेला विद्यार्थ्यांच्या जातीचा दाखला
  7. पालक किंवा आई वडील यांचे स्वघोषणापत्र 
  8. विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते पुस्तकाची छायांकित प्रत 
  9. विद्यार्थ्यांचा रहिवाशी दाखला 
  10. विहित नमुन्यातील मुख्याध्यापकांचे शिफारस पत्र 
  11. रेशन कार्डची छायांकित प्रत 
                          विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरल्यानंतर प्रथम हप्ता 50 हजार रुपये त्याच्या बँक खात्यामध्ये आरटीजीएस या बँकिंग प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल. उरलेले तीन हप्ते सहा महिन्याच्या कालावधीमध्ये देण्यात येतील. विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीमध्ये भाषा विषय वगळून 75 % पेक्षा अधिक गुण मिळणे आवश्यक आहे. अर्जामध्ये भरलेली माहिती बनावट, दिशाभूल व खोटी असल्यास शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल. या योजनेचा लाभ मिळाला असल्यास मिळालेला लाभ वसूल केला जाईल. या योजनेबद्दल काही वाद निर्माण झाल्यास नियमक मंडळ बार्टी, पुणे या संस्थेच्या सल्ल्याने महासंचालक या संदर्भातील निर्णय घेतील.

अधिक माहितीसाठी

बार्टीचे संकेतस्थळ:  https://barti.maharashtra.gov.in/  

संपर्क :  020-26333330, 020-26333339

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या