"ज्ञानवर्धिनी वाचनालया मध्ये एसएससी 2024 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव संपन्न"
दिनांक 28 मे वार गुरुवार 2024 मध्ये पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी येथील ज्ञानवर्धिनी वाचनालय यांचे तर्फे आयोजित यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपन्न झाला. यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री. भास्कर बंगाळे सर, श्री सुधाकर पडवळ व ज्येष्ठ शिक्षणप्रेमी महाराष्ट्र माझाचे संपादक श्री. अविनाश सुर्वे, त्याचबरोबर थोर साहित्यिक श्री. अंकुश गाजरे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजेश पवार सर यांनी केले. श्री सुधाकर पडवळ यांनी आपल्या भाषणातून स्पर्धा परीक्षेचे महत्त्व विशद केले व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. तर श्री भास्कर बंगाळे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवातून मागची परिस्थिती कशी होती व आत्ताची परिस्थिती काय आहे याची इत्यंभूत माहिती दिली. न थकता अभ्यास करा हा मूलमंत्र त्यांनी दिला. श्री अविनाश सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायाकडे वळा असा उपदेश दिला. याप्रसंगी शेळवे कृषी विद्यालय शेळवे येथे प्रथम आलेली कु. रेश्मा पवार हीने आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी त्याचबरोबर पालक श्री विठ्ठल प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. आर.डी.पवार सर, यशवंत नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री शहाजी बापू साळुंखे, गावचे विद्यमान सरपंच श्री संतोष भारत साळुंखे, परफेक्ट कॉम्प्युटरचे श्री. सुधाकर पवार, उपसरपंच श्री शहाजी पाटील, माजी सुभेदार श्री. सुभाष दिगंबर पवार त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक श्री सुरेश बाजीराव साळुंखे, श्री पवन पाटील, श्री. सिद्धेश्वर पवार, श्री. राजाभाऊ बनसोडे, शाळेचे कर्मचारी श्री अरविंद चौगुले त्याच बरोबर शिक्षण प्रेमी अनेक नागरिक उपस्थित होते. अंकुश गाजरे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजेश पवार सर यांनी केले. शेवटी प्राध्यापक राजाभाऊ साळुंखे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या