सर्वाधिक उत्तीर्ण विद्यार्थी कोकण विभागातील
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रकेची फोटोकॉपी मिळणार आहे. इयत्ता दहावीसाठी सहा विषय असून बेस्ट ऑफ फाईव्ह साठी पाच विषयाची निवड केली जाते. बेस्ट ऑफ फाईव्ह मधून एकूण टक्केवारी जाहीर केली जाते. सालाबाद प्रमाणे या वर्षीही मुलींनी निकालामध्ये बाजी मारलेली आहे.
विभागीय मंडळ पुणे येथे एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी (Registered) 264525 एवढी झालेली होती. परीक्षेत बसलेले विद्यार्थी 262949 एवढे होते. त्यापैकी उत्तीर्ण 253600 एवढे विद्यार्थी होते. त्यांची एकूण टक्केवारी (Percentage) 96.44 होती. पुणे विभागिय मंडळाचा टक्केवारीमध्ये तृतीय क्रमांक आला. कोकण विभागातील 99.01% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागीय मंडळामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. कोल्हापूर विभागातील 97.45% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागीय मंडळामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे.
0 टिप्पण्या