Ujani Dam सोलापूर जिल्ह्याची वरदायनी उजनी धरणाची ऐतिहासिक नोंद

सोलापूर जिल्ह्याची वरदायनी उजनी धरणाची ऐतिहासिक नोंद



                          सोलापूर जिल्ह्याची वरदायनी उजनी धरणाची ऐतिहासिक नोंद झालेली आहे. उजनी धरण 1980 साली बांधण्यात आलेले आहे. उजनी धरणाची साठवण क्षमता 123 टीएमसी एवढी आहे. यावर्षी 15 ऑक्टोबर 2023 ला 60.66 % भरलेले होते. सध्या उजनी धरणामध्ये -59.30 % एवढा मृत साठा उपलब्ध आहे. यापूर्वी 2019 रोजी -59.05 टक्के एवढा मोठा साठा उपलब्ध होता. उजनी धरणाच्या बॅक वॉटर एरियामध्ये 50 ते 70 फूट पाणी होते. ते आता पूर्णपणे कोरडे पडले आहे. ओसाड जमीन पहावयास मिळत आहे. ज्या ठिकाणी पाणीच पाणी होते तेथे आता कोरडी जमीन दिसत आहे. त्यामुळे भीषण दुष्काळ 2024 मध्ये पडलेला आहे. पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी पाणी व पिकांसाठी पाणी मिळेना. दुष्काळाच्या भयंकर झळा जाणवू लागल्या आहेत. जल है तो कल है. या प्रमाणे जर पाणी असेल तर सर्वकाही असेल. पाण्याचे महत्व लक्षात घेऊन जलसंवर्धनाच्या उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या