लोकसभा निवडणूक 2024 निकाल
लोकसभा निवडणुकीचा निकाल काही तासांवरती आलेला आहे. भारताचा पुढचा पंतप्रधान कोण ? हे या लोकसभेच्या निकालानंतर ठरणार आहे. लोकसभेच्या निकालानंतर समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये. म्हणून ज्या सोशल मीडिया आहेत त्यावरती पोलीस प्रशासन लक्ष ठेवणार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्टिटर, व्हाट्सअप ग्रुप आणि इतर सोशल मीडिया माध्यमांद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या, गटाच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजीटल बॅनर, पोस्ट्स वरील माध्यमाव्दारे पसरवू नयेत. दिनांक 04/06/2024 रोजी जाहीर होणार आहे. सदर मतमोजणी दरम्यान व निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मिडीयाव्दारे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्टिटर, व्हाट्सअप ग्रुप आणि इतर सोशल मीडिया माध्यमांद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या, गटाच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजीटल बॅनर, पोस्ट्स वरील माध्यमाव्दारे पसरवू नयेत. अशा प्रकारच्या पोस्ट कमेंट्सवर सायबर पोलीस ठाणे नजर ठेऊन आहे तसे केलेले आढळल्यास सोलापूर ग्रामीण सायबर पोलीस ठाणे कडून योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा पद्धतीचे पत्र ग्रामीण पोलिस अधीक्षक सोलापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
0 टिप्पण्या