शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
तुषार सिंचन व ठिबक सिंचन योजनेचा लाभ घ्यावा
शेतीसाठी शेतकऱ्यांना पाणी असेल तर भरघोस असे उत्पादन काढू शकतात. परंतु वारंवार दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. शेतकऱ्यांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन योजनेबाबत अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक 15 जून 2024 ते 30 जून 2024 पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पिक या योजनेअंतर्गत आणि सूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन तुषार सिंचन देण्यात येणार आहे. या योजनेचे अर्ज अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी अर्ज करावेत असे आव्हान सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केली आहे.
0 टिप्पण्या