Tongue exercise जिभेचा व्यायाम केल्याने असाध्य रोग बरा होतो"अल्झायमर" स्मरणशक्ती जाणारा आजार, जिभेचा व्यायाम केल्याने होणारे फायदे, जिभेचा व्यायाम कसा करावा, जिभेच्या व्यायामाचे फायदे

 "अल्झायमर" स्मरणशक्ती जाणारा आजार....

जिभेचा व्यायाम केल्याने असाध्य रोग बरा होतो




                अल्झायमर या आजारामध्ये मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट होऊन स्मरणशक्ती नष्ट होते. डॉ. आलोइस अल्झायमर मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध महिलेच्या मेंदूतील पेशींचा अभ्यास केला. त्यातून त्यांना नवे संशोधन सापडले. मृत वृद्ध महिलेच्या मेंदूतील पेशीतील बदल 1906 साली सापडले. बोलताना अडखळणे, विस्मरण होणे, लहरी वर्तन अशी लक्षणे त्या महिलेच्या वर्तनामध्ये दिसून आली होती. मृत्यूनंतर मेंदूची तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये गाठी आढळल्या. हा आजार वृद्धांना होणार आहे. डॉ. आलोइस अल्झायमर यांच्या नावावरून अल्झायमर हे नाव पडलेले आहे. वयाच्या 50 व्या वर्षानंतर हा आजार होऊ शकतो. या वयामध्ये असे अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात. परंतु ज्याची मला सर्वात जास्त काळजी आहे तो म्हणजे अल्झायमर. कारण अल्झायमर रुग्णांना सांभाळने कुटुंबातील लोकांना फार कठीण असते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना असुविधा निर्माण होते. या आजारामध्ये जिभेचा व्यायाम केल्याने आजाराची तीव्रता कमी होऊ शकते. अल्झाइमर आजार होऊ नये यासाठी जिभेचा व्यायाम प्रभावी आहे, तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत.


 जिभेचा व्यायाम केल्याने पुढील फायदे होतात...

  1. शरीराचे वजन संतुलित ठेवणे 
  2. रक्तदाब संतुलित ठेवणे 
  3. मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे
  4. दमा कमी करणे 
  5. जवळची दृष्टी चांगली करणे
  6. कान गुंजने कमी करणे
  7. घसा कमी खराब होणे  
  8. खांदा / मान यांचा संसर्ग कमी होणे 
  9. झोप चांगली लागणे

जिभेचा व्यायाम कसा करावा...

जिभेचा व्यायाम अगदी सोपा आणि शिकण्यास सुलभ आहे. दररोज सकाळी खाली दिल्या प्रमाणे व्यायाम करा.

  1.  आपली जीभ बाहेर काढा आणि 
  2. 10 वेळा डावीकडे हलवा.
  3. 10 वेळा उजवीकडे हलवा.


जिभेच्या व्यायामाचे फायदे 

नियमित हा व्यायाम केल्याने आठवण / स्मरणशक्तीमधे सुधारणा होते. तसेच डोके हलके आणि ताजेतवाने वाटायला लागते आणि इतर अनेक सुधारणाही होत आहेत. व्यायाम केल्याने पुढील फायदे होतात...

  1. जवळचे नीट दिसायला लागते.
  2. शरीर संतुलन राहायला लागते.
  3. तब्येत व्यवस्थित राहते.
  4. चांगले पचन होते.
  5. सर्दी खोकला कमी होतो.

जिभेचा व्यायाम केल्याने शरीर अधिक सामर्थ्यवान आणि चपळ होते. जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते. वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेचा BIG ब्रेनशी संबंध आहे. जेव्हा आपण म्हातारे आणि अशक्त होतो, तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बर्‍याचदा आपण जीभ चावतो. जिभेचा वारंवार व्यायाम मेंदूला उत्तेजित करेल. आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करेल आणि स्वस्थ शरीर व निरोगी शरीर होण्यास मदत होईल.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या