शाळा प्रशासन व पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल नष्ट करण्यास समुपदेशन केले

शाळा प्रशासन व पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल नष्ट करण्यास समुपदेशन केले 



                 नायजेरिया या देशांमध्ये शाळेत विद्यार्थ्यांच्या मोबाईल अति वापराचा परिणाम लक्षात घेऊन शाळा प्रशासन व पालक यांनी विद्यार्थ्यांचे मोबाईल जमा करून ते फोडून नष्ट करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेला आहे.

                मोबाईलच्या अतिवापराने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये अनिष्ट असे परिणाम येऊ लागलेले आहेत. विद्यार्थी एकलकोंडे होऊ लागलेले आहेत. तासनतास मोबाईलचा वापर होऊ लागलेला आहे. मोबाईलवर रिल्स पाहणे, वेगवेगळ्या गेम्स खेळणे, रमी खेळणे व अश्लील व्हिडिओ पाहणे या सारख्या अनेक गोष्टी मुले करत असतात. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. नको त्या वाईट गोष्ट मध्ये ते गुंतून पडतात. त्यामुळे मोबाईलचा वापर हा कमीत कमी केला पाहिजे. त्यामुळे सर्वच शाळांनी व विशेतः पालकांनी मुलांना मोबाइल वापरापासून थांबवले पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या