Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना फसवणुकीचे कॉल्स, OTP किंवा लिंक मागणे
महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यात आलेली आहे.
योजनाचा उद्देश हा आहे की, राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे व महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा. अशा अनेक होतात हेतूने हे योजना सुरू केलेली आहे. परंतु फसवणुकीचे कॉल येणे, ओटीपी किंवा लिंक मागणे अशा पद्धतीची मागणी करून आपली फसवणूक होऊ शकते. लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्यांसाठी फसवणूक टाळण्यासाठी खालील मुद्द्यांवर लक्ष द्यावे...
फसवणुकीचे कॉल्स
योजनेच्या नावाखाली काही लोक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा पहिला हप्ता जमा करण्याच्या बहाण्याने तुम्हाला कॉल करू शकतात. तुमचे वैयक्तिक माहिती विचारली जाईल बँके विषयी माहिती विचारली जाईल. व काही क्षणामध्ये तुमचे बँक अकाउंट खाली केले जाईल. तर अशा कॉल पासून आपण सावध राहावे.
OTP किंवा लिंक मागणे
फसवणुकीच्या कॉलमध्ये व्यक्ती तुमच्याकडून OTP मागू शकतो किंवा एखादी लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगू शकतो. आपण कोणताही ओटीपी किंवा दिलेली लिंक क्लिक करू नये. होणारे आपले नुकसान टाळावे.
लिंक किंवा OTP देऊ नका
जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केले किंवा OTP दिले, तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होईल.
सतर्क रहा
कुठल्याही अनधिकृत व्यक्तीस OTP देऊ नका आणि अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. अधिकृत माहिती आणि खात्रीशीर स्त्रोतांकडूनच माहिती घ्या. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सायबर फसवणुकीचा सामना करावा लागला तर कृपया तात्काळ https://www.cybercrime.gov.in ला अहवाल द्या किंवा 1930 वर कॉल करावा.
ही माहिती शेअर करा
आपल्या माता-बहिणींना या फसवणुकीबद्दल सावध करा, जेणेकरून त्यांना या प्रकारच्या फसवणुकीपासून वाचता येईल.
0 टिप्पण्या