Mpsc Exam महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा २०२४ अपडेट
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, जाहिरात क्रमांक ४१४/२०२३ ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्गातील पदभरतीकरीता दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून विषयांकित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते. यासंदर्भात आज दिनांक २२ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेचा सुधारित दिनांक लवकरच जाहीर करण्यात येईल.
0 टिप्पण्या