Mukhymantri Yuva Kary Yojana मुख्यमंत्री युवा कार्य योजना

Mukhymantri Yuva Kary Yojana मुख्यमंत्री युवा कार्य योजना



                   कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे शासन निर्णय क्र. संकीर्ण- 2024/प्र.क्र.90/व्यशि-3, दि.9/7/2024 अन्वये, राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-2025 या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 06 महिन्याचा राहील. उक्त योजनेतंर्गत उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येईल.

                  छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत या योजनेतंर्गत उपलब्ध पदे, शैक्षणिक अर्हता, वेबसाईटवर नोदणी करावयाची पध्दत इ. सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या www.chhsambhajinagarmc.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र उमेदवारांनी महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभाग (आस्थापना 1 विभाग), मुख्य कार्यालय, टाऊन हॉल, छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक अर्हतेच्या मुळ कागदपत्रांसह दि. 19 व 20 ऑगस्ट, 2024 रोजी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे. तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वेबपोर्टल https://rojgar.mahaswavam.gov.in वर Online नोंदणी करावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या